Beef esakal
नाशिक

चांदवडला तब्बल 3 लाखांचे गोमांस जप्त; तिघे गजाआड

भाऊसाहेब गोसावी

चांदवड (जि. नाशिक) : शहरातील नानावली मशीद परिसरात गोमांस विक्री करताना चांदवड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. खलिल फकिरा मोहम्मद कुरेशी (वय ४२, रा. माऊलीनगर, नांदगाव), नदीम फारूक कुरेशी (वय ३०) (रा. चांदणी चौक, ओझर, ता. निफाड), नईम फारूक कुरेशी (वय ३०, रा. चांदणी चौक, ओझर) हे आपल्या चारचाकीतून (एमएच १५ सीएम ०६१०) ४८ किलो गोमांस नानावली मशीद परिसरात व मोटारसायकल (एमएच ४१ एएफ ९५५९) वरून १७ किलो ४५० ग्रॅम गोमांस घेऊन जाताना श्रीराम रोड, चांदवड येथे मिळून आले.

तब्बल 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

त्यामुळे प्राणी संरक्षण कायदा २०१५ चे सुधारित कलम ५ (क), ९ (अ), ९ (ब) भादवि कलम १८८ उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात मोटारसायकल, कार व गोमांस यांसह तीन लाख ४५ हजार ४७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चांदवड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्सेटबल चंद्रकांत पवार, पोलिस नाईक अरुण डोंगरे, बी. एन. वालेकर, आर. बी. बिन्नर व सुशांत मरकड तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi press conference: राहुल गांधींनी दाखवले पोलिसांच्या क्रूरतेचे धक्कादायक फोटो; अमित शाहांचं नाव घेत केला गंभीर आरोप

Live Marathi News Update : केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांना पत्र लिहिले

Pune Investment Scam: शेअर मार्केट व ऑनलाइन टास्कच्या आमिषाला चौघे बळी; पुण्यात ४६ लाखांची सायबर फसवणूक

Pune Gurupurnima Celebration: पुण्यात गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्सव; मंदिरांपासून शैक्षणिक संस्थांपर्यंत गुरु-शिष्य परंपरेचा सन्मान

Vaibhav Sooryavanshi कडे थेट उपकर्णधारपदाची जबाबदारी! BCCI च्या प्रमुख स्पर्धेत ईशान किशनच्या नेतृत्वात खेळणार

SCROLL FOR NEXT