नांगरणी  esakal
नाशिक

खरीप पेरणीपूर्वी नांगरणीला सुरवात; शेतजमीन भुसभुशीत करण्यावर भर

संदीप पाटील

विराणे (जि. नाशिक) : माळमाथा परिसरात एप्रिल महिन्याच्या सुरवातीला बहुतांशी ठिकाणी कांदा काढणी केली जाते. बहुतांश विहीरीतील तळ गाठतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताला कामच राहत नाही. वेळेचा वापर येणाऱ्या खरीप हंगामासाठी शेतजमीन नांगरून ठेवणे व ती भुसभुशीत करण्यावर शेतकरी भर देत असतात.

जमिनीची लवकर मशागत केल्याने हवा खेळती राहते. शिवाय भरघोस उनदेखील जमिनीला मिळते. त्यामुळे रब्बी व उन्हाळी कांदा काढणीनंतर माळमाथा परिसरात खरीपपूर्व मशागतीला वेग आला आहे. एप्रिलपासून येथील शेतकरी मशागतीला वेग आणतात. कारण, मे महिन्यात उन्हाचा पारा अधिक चढतो. यात काम करणे जिकरीचे जाते. शिवाय बैलजोडीची देखील मोठ्या प्रमाणात दमछाक होते. नांगरून उन्हात तळपलेल्या शेतात खरीप हंगामात तणदेखील कमी होते. परिणामी, निंदणी खर्च कमी होतो. नांगरणीनंतर खत पसरविण्यासाठी भरपूर वेळ मिळत असतो. ट्रॅक्टरपेक्षा बैलांनी केलेली नांगरणी अधिक भुसभुसीत असते. म्हणून बहुतांश शेतकरी बैलांच्या नांगरणीला पसंती देतात. इतर कामे थांबल्याने शेतकऱ्यांना भरपूर वेळ असतो.

"बैलजोडीची नांगरणी ट्रॅक्टरपेक्षा स्वस्त असते. शिवाय नांगरणी खोलवर जात असल्याने खरीप पिकांत तण कमी होते. त्याचा फायदा पिकांना होतो."

-अरविंद देवरे, शेतकरी, चिंचवे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT