Bishop Lurdus Daniel, Grand Guru of Nashik Catholic Diocese, guiding the devotees in Baby Jesus Yatra. Devotees present in the second photograph. esakal
नाशिक

Nashik News : दीड लाखावर भाविकांकडून बाळ येशूचे दर्शन; यात्रेला प्रारंभ

प्रभूच्या आदर्शानुसार आपण वाटचाल केली, त्याच्यासारखे परिपूर्ण झालो तरच आपण त्याचे पुत्र म्हणून घेण्यास पात्र आहोत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : भाविकांचा हा महासागर पाहून परमेश्वराप्रति असलेल्या अगाध श्रद्धेची प्रचिती येते. प्रभू प्रेमळ, दयाळू, क्षमाशील असल्याची, तो आपणा सर्वांचा असल्याची खात्री पडते. शत्रूलाही प्रभू क्षमा करतो. प्रभू फक्त प्रेमच करतो. तो कधी कोणाचा द्वेष करीत नाही.

प्रभूच्या आदर्शानुसार आपण वाटचाल केली, त्याच्यासारखे परिपूर्ण झालो तरच आपण त्याचे पुत्र म्हणून घेण्यास पात्र आहोत. (Beginning of Yatra one lakh devotees saw baby Jesus nashik news)

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे, लाखो रुपये खर्च करून कारखान्यात कृत्रिम माणूस तयार केला जाईलही, पण ईश्वराने निर्माण केलेल्या मानवाची सर त्याला कधीच येणार नाही. प्रभूसारखे क्षमाशील, उदात्त, प्रेमळ हृदय त्याला मिळणार नाही. तुम्हाला काय पाहिजे हे प्रभूला चांगले ठाऊक आहे.

त्याच्या आदर्शानुसार तुम्ही वाटचाल केली तर तो तुमची निराशा तो कधी करणार नाही, असे मार्गदर्शन नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे महागुरू बिशप ल्युर्डस डॅनिअल यांनी केले. देशभरात प्रसिद्ध असलेल्या बाळ येशूच्या दोन दिवसाच्या यात्रेला शनिवारी (ता. १०) उत्साहात सुरवात झाली. नाशिक- पुणे मार्गावरील उपनगरजवळील सेंट झेव्हियर शाळेच्या आवारातील या यात्रेत पहिल्याच दिवशी देशभरातून आलेल्या दीड लाखावर भाविकांनी दर्शन घेतले.

रविवार (ता. ११) पर्यंत अडीच लाख भाविक दर्शन घेतील असा अंदाज मुख्य धर्मगुरू फादर एरोल फर्नांडिस यांनी व्यक्त केला. भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याने या मार्गावरील वाहतूक जेल रोड, तपोवन तसेच अन्य मार्गे वळविण्यात आली होती. सकाळी अकरा वाजता बिशप ल्युर्डस डॅनिअल यांच्या उपस्थितीत मुख्य मिसा झाला.

पोलिस महासंचालक जयप्रकाश, मुख्य धर्मगुरू फादर एरोल फर्नांडिस यांची प्रमुख उपस्थिती होती. यात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळी सहापासून इंग्रजी, मराठी, कोकणी, तमीळ भाषेत मिळून एकूण चौदा विशेष मिसा झाले. फादर एरोल फर्नांडिस, फादर अशोक गोन्सालविस, फादर लेरॉय, फादर बॉस्को, अॅन्ड्रू रॉड्रीग्ज आदींनी मिसा केला.

रविवारी (ता. ११) इंग्रजी व मराठीत सहा मिसा झाल्यानंतर यात्रेची सांगता होईल. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक उपायुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे, रामदास शेळके आदींनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. वाहतूक पोलिसांचीही त्यांना मोठी मदत होत आहे.

यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल झाली. सेंट झेवियर्स शाळेच्या प्रांगणात उभारलेल्या भव्य मंडपात सकाळी सहा ते सायंकाळी आठपर्यंत दर तासाला इंग्रजीसह विविध भाषांमध्ये पवित्र मिसा देण्यासाठी देशभरातून फादर हजर होते. रेल्वे व खासगी गाडीने भाविक दाखल होत आहेत. मुंबई, वसई, गोवा येथील भाविकांची संख्या लक्षणीय आहे. भाविकांच्या निवासासाठी चर्चमधील सभागृहात व्यवस्था करण्यात आली आहे.

परिसरातील हॉटेल, लॉजमध्येही भाविकांनी मुक्काम ठोकला आहे. भाविकांच्या वाहनांसाठी नेहरूनगर, जयभवानी रोड, उपनगर येथे पार्किंगची सोय आहे. द्राक्ष, चिकू, संत्रे तसेच रसवंती व अन्य विक्रेत्यांनीही महामार्गाच्या दुतर्फा दुकाने थाटली आहेत.

चोरांना प्रतिबंधासाठी तसेच यात्रा निर्विघ्न पार पडण्यासाठी पोलिसांना मदतीसाठी स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. भाविक मुख्य प्रवेशद्वारातून दर्शनासाठी गेल्यानंतर दुसऱ्या दरवाजाने बाहेर पडत होते. त्यांच्या शिस्तीमुळे व संयोजक व पोलिसांच्या मेहनतीमुळे यात्रेत कोणतीही समस्या उद्भवली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT