chilly esakal
नाशिक

तिखट मिरचीची गोड कहाणी! एकरी दोनशे क्विंटल उत्पादन

एस.डी.आहीरे

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : निफाड (niphad) तालुका म्हटला की द्राक्ष, (grapes) ऊस अशी जीभेवर गोड चव पेरणारी फळपिकांच्या उत्पादनांची राजधानी अशी ओळख. पण, याच निफाडच्या पूर्व - उत्तर भागातील वनसगाव व परिसरातील शेतकरी झणझणीत तिखट मिरचीचे दर्जेदार उत्पादन घेत आहेत. मिरचीचे आगार (chillies cultivation) अशी या परिसराची ओळख झाली असून, शेतकऱ्यांच्या मेहनतीच्या मिरचीला उत्त्पन्नाचे गोड फळ सध्या लगडले आहे. या परिसरातील मिरचीची काढणी सुरू झाली असून, राज्य-परराज्यात येथील मिरची पोहचत आहे.

सात वर्षांपासून मिरची उत्पादक शेतकऱ्याना प्रत्यय

कष्टाला नियोजनाची जोड दिल्यास शेतकरी आर्थिक उत्पन्न मिळवू शकतो, याचा प्रत्यय सात वर्षांपासून मिरची उत्पादक शेतकरी घेत आहे. वनसगाव, सावरगाव, नांदुर खुर्द, रेडगाव, थेटाळे, सारोळे या गावांमध्ये एकूण ५०० एकरहुन अधिक क्षेत्रावर मिरचीचे पिक सध्या बहरलेले आहे. आरमार, नंदीता, पिकाडोर या वाणांच्या मिरच्या झाडांना लगडल्या आहेत. भाजीला तिखट तडका व ढेचा बनविण्यासाठी येथील मिरच्या आता बाजारात येऊ लागल्या आहेत. वनसगाव परिसरातील सहा ते सात गावांतील शेतकऱ्यांना खानगाव येथील बाजारपेठ वरदान ठरत आहे. मिरची खरेदी करणारे व्यापारी येथे मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे बाजारभावही उच्चांकी मिळतो. सध्या २५ रूपये प्रतिकिलो असा दर मिळत आहे.

एकरी दोनशे क्विंटल उत्पादन...

बाबाजी शिंदे (नांदुर खुर्द), प्रकाश कुशारे (सावरगाव), गणपत चव्हाण (रेडगाव) यासह सुमारे ३०० शेतकरी मिरचीच्या उत्पादनांचा गोडवा चाखत आहे. पूर्वी हेच शेतकरी टोमॅटोचे उत्पादन घ्यायचे. पण, दराचा भरवसा नाही. त्यात रोगांच्या आक्रमणाने उभे पिक सोडून द्यायचे. यामुळे येथील शेतकऱ्यांचा कल मिरची उत्पादनाकडे अधिक राहिला. शिवाय वर्षभर मिरचीचे पिक सुरू असते. त्यात भाव नसेल तर उन्हात वाळवून लाल मिरची सुमारे २५० रूपये किलोपर्यंत विकली जाते. एकरी ५० हजार रूपये खर्चात सुमारे २०० क्विंटल मिरचीचे उत्पादन निघते. त्यातून किमान खर्च वजा जाता चार लाख रूपये हमखास मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. मल्चिंग पेपरसह आधुनिक पद्धतीचा वापर करून शेतकरी दर्जेदार मिरची पिकवू लागल्याने येथील मिरचीला परराज्यातून मोठी मागणी आहे. वर्षभरात या परिसरातून सुमारे एक लाख क्विंटल मिरचीचे उत्पादन होते. त्यातून सुमारे २० कोटी रूपयांचे अर्थकारण फिरते. तिखट मिरचीची गोड कहाणी ही पारंपारिक पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहेत.

भाव घसरलेले असले तरी किमान खर्च तरी वसूल होतो व दर चांगला असेल तर चांगले उत्पन्न मिळते, असा मिरची पिकाचा गेल्या पाच वर्षाचा माझा अनुभव आहे. टोमॅटोपेक्षा निश्‍चि‍चीत शाश्‍वत उत्पादन देणारे पिक असल्याने परिसरातील बहुतांश शेतकरी मिरची पिकाकडे वळले आहे. - बाबाजी शिंदे, शेतकरी, नांदुर खुर्द

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident: ताम्हिणी घाटातल्या गूढ अपघाताचा उलगडा… कोकणातून हॉटेल चालकाचा फोन ठरला टर्निंग पाईंट! नाहीतर...

Kolkata Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने कोलकाता हादरले; लोक घाबरून घरं सोडून पळाले; बांगलादेशातही बसले हादरे

Television Day 2025: स्क्रीनवरचे डाग होतील गायब! ‘या’ 3 उपायांनी करा टीव्हीची परफेक्ट स्वच्छता

Latest Marathi News Live Update : विद्येचे धडे देणाऱ्या मुख्याध्यापकांचा शाळेत मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा

Ashes 2025 England vs Australia : खरोखरची राख असलेली 'अ‍ॅशेस ट्रॉफी' आता कुठं आहे? त्यात नेमकी कशाची राख आहे? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT