bangalore rose onion esakal
नाशिक

Nashik Onion News: बेंगळुरू ‘रोझ’ कांद्याला निर्यातीच्या 40 टक्के शुल्कातून केंद्राची सवलत!

कर्नाटक फलोत्पादन आयुक्तांचे प्रमाणपत्र बंधनकारक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Onion News : केंद्र सरकारने बेंगळुरू ‘रोझ’ कांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्कात सवलत दिली आहे. मात्र, त्यासाठी कर्नाटक सरकारच्या फलोत्पादन आयुक्तांचे प्रमाणपत्र बंधनकारक असेल.

निर्यातीच्या कांद्याचे प्रमाण प्रमाणित करावे लागेल, असे केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. (Bengaluru Rose Onion relief from 40 percent export duty Nashik News)

पावसाच्या अनिश्‍चिततेच्या पार्श्‍वभूमीवर ३१ डिसेंबरपर्यंत देशांतर्गत बाजारातील कांद्याची उपलब्धता सुधारण्यासह भाववाढ रोखण्यासाठी म्हणून केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केले.

केंद्राने यंदा तीन लाख टन कांद्याचा ‘बफर स्टॉक’ ठेवण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी हे प्रमाण दोन लाख ५१ हजार टन एवढे होते. एप्रिल ते जूनमध्ये काढलेल्या रब्बी कांद्याचा देशातील एकूण कांदा उत्पादनात ६५ टक्के वाटा आहे.

खरीप कांद्याची ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत काढणी होईपर्यंत हा कांदा ग्राहकांसाठी उपलब्ध असतो. निर्यात शुल्क लागू केल्यावर केंद्र सरकारतर्फे सुरवातीला तीन लाख, त्यानंतर दोन लाख आणि नुकताच दोन लाख टन कांदा शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याचे धोरण स्वीकारले आहे.

मात्र, या सरकारच्या निर्णयाविरुद्ध कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होण्याचे आंदोलन सुरू केले आहे.

निर्यात शुल्काचा विचार करण्याची तयारी केंद्राने दर्शवली असताना, बेंगळुरू ‘रोझ’ कांद्याच्या निर्यातीवरील शुल्कात सवलत दिली असल्याने कांद्याच्या आगारातील शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांची आपल्या कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करावे, ही मागणी ऐरणीवर आली आहे.

बेंगळुरू ‘रोझ’ कांद्याची लागवड बेंगळुरू, चिक्कबल्लापूर आदी जिल्ह्यांत पाच हजार एकरावर लागवड होते. त्यातून ६० हजार टनांपर्यंतचे उत्पादन मिळते. तुमकूर, हसन, दावणगिरी, धारवाड आणि बागलकोट भागातही या कांद्याची लागवड होते.

देशाच्या इतर ठिकाणी लागवड होत नाही. हा कांदा मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया, बहारीन, अरब राष्ट्र, बांगलादेश, श्रीलंका, हाँगकाँगमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो.

हा कांदा तिखट असून, त्याचा विशेषतः सांबरसाठी वापर केला जातो. कांद्याच्या या वाणाला २०१५ मध्ये भौगोलिकदृष्ट्या ‘जीआय टॅग’ मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajendra Singh: ध्येयवेड्यांनीच क्रांती केल्याचा इतिहास: जलपुरुष राजेंद्र सिंह; बंदुकीच्या जागी हातात कुदळ, फावडी

Latest Marathi News Live Update : सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, बाळा नांदगावकर यांची मागणी

कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीमध्ये घरात चिंतेचं वातावरण, दिराने सांगितलं कुटुबात नक्की चाललंय काय?

Mumbai News: एशियाटिक टाऊन हॉलची दुरवस्था! इतिहास जपायचा की निवडणुका जिंकायच्या? दुहेरी आव्हान उभं

Beed News: गरोदर महिलेच्या जिवाशी खेळ कशासाठी? लेबर रूमसमोरच महिलेची प्रसूती, बीड जिल्हा रुग्णालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT