dengue esakal
नाशिक

नाशिककरांनो सावधान! डेंगी, चिकुनगुनियाचा उद्रेक

विक्रांत मते

नाशिक : शहरात चिकुनगुनिया (chikungunya) व डेंगीचा (dengue) उद्रेक कायम असून पाच दिवसात डेंगीचे सत्तर तर चिकुनगुनियाचे चाळीस रुग्ण नव्याने आढळले आहेत. शहरात औषध फवारणी होत नसताना जीवशास्त्रज्ञ विभागाकडून मात्र आठ महिन्यात दहा लाखांहून अधिक ठिकाणी फवारणी झाल्याचा दावा केला आहे.

पाच दिवसात ११० रुग्णांची नोंद; डेंगी, चिकुनगुनियाचा उद्रेक

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना शहरात डेंगी, चिकुनगुनियासह साथीच्या आजारांनी तोंड वर काढले आहे. जानेवारी ते ऑगस्ट अखेर शहरात डेंगीचे ५८८ रुग्ण आढळले होते. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांमध्ये तब्बल सत्तर रुग्ण नव्याने आढळून आल्याने ६४७ वर रुग्णसंख्या पोहोचली आहे. सिडको विभागात डेंगीचा उद्रेक कायम आहे. सिडकोत १४५, पूर्व मध्ये ४४, नाशिक रोड विभागात १०१, पंचवटीत ११३, पश्‍चिम विभागात ६६ तर सातपूर विभागात १०८ रुग्ण डेंगीचे आढळले आहेत. चिकुनगुनियाचे रुग्ण देखील सिडको विभागातचं अधिक आढळले आहेत. सिडकोत १३८, सातपूर १३६, पूर्व भागात २०, पश्‍चिम विभागात ७०, नाशिक रोड विभागात २४, पंचवटी विभागात ५४ चिकुनगुनियाचे रुग्ण आढळले. सप्टेंबरच्या पाच तारखेपर्यंत चाळीस नवीन रुग्ण आढळले. डेंगी व चिकुनगुनियाचा सर्वाधिक उद्रेक सिडको विभागात असल्याचे दिसून येत आहे.

दहा लाख ठिकाणी औषध फवारणी

शहरात डेंगीचा उद्रेक वाढतं असताना नागरिकांकडून औषध व धूर फवारणी होत नसल्याची ओरड होत आहे. परंतु आरोग्य विभागाने दहा लाख १५ हजार ४५२ ठिकाणी औषधे व धूर फवारणी झाल्याचा दावा केल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. अळीचे ठिकाणे तपासण्यासाठी आठ लाख ९१ हजार ५७८ घरांची तपासणी केल्याचा दावा केला जात आहे. शहरात पावणेपाच लाखांच्यावर मालमत्ता आहेत. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार एका ठिकाणी दोनदा फवारणी झाल्याचा निष्कर्ष निघतो. वास्तविक अनेक ठिकाणी औषधे व धूर फवारणीचं होत नसल्याच्या तक्रारी असताना एका ठिकाणी दोनदा फवारणी झाल्याचा दावा फोल ठरतो. आरोग्य विभाग दाव्यावर ठाम असून एका ठिकाणी पाच ते सहा वेळेस फवारणी होऊ शकते, असे समर्थन केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य सुरू

Pune Accident: पुण्यात धक्कादायक घटना! वडाचे झाड अंगावर कोसळून दोन महिला जखमी; प्रकार CCTV मध्ये कैद

Satara News: माण तालुक्यात धक्कादायक प्रकार; एफडीएच्या भीतीने दूध रस्त्यावर ओतल्याने भेसळीच्या चर्चांना उधाण

Latest Marathi News Live Update : देशातील सर्वात मोठे ऍग्रो कन्वेंशन सेंटर नागपुरात - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Solapur: पत्नीच्या भांडणाला व तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून एका 26 वर्षीय युवकाने राहत्या घरी घेतला गळफास मोहोळ तालुक्यातील यावली येथील घटना

SCROLL FOR NEXT