IAS Bhagayshree Banayat esakal
नाशिक

Bhagyashree Banayat : सरकारी वाहनाचे रीतसर पैसे भरणारच : भाग्यश्री बानाईत

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : माझे कुटुंब शिर्डी येथे असून, माझ्या दोन लहान मुली या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे मी नियमित आठ रुपये किलोमीटर या दराप्रमाणे महापालिकेचे सरकारी वाहन घेऊन या ठिकाणी ये- जा करत असते. यामुळे मी रीतसर पैसे भरणारच असल्याचे स्पष्टीकरण महापालिका अतिरिक्त आयुक्त भाग्यश्री बानाईत यांनी दिले. (Bhagyashree Banait nmc additional commissioner statement Will pay for government vehicle properly nashik news)

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

महापालिकेच्या हद्दीबाहेर महापालिकेचे वाहन घेऊन जाता येत नाही. त्यासाठी सबळ असे तांत्रिक कारण आवश्यक असते. अतिरिक्त आयुक्त बानाईत यांनी महापालिकेचे वाहन शिर्डी येथे घेऊन गेल्याने महापालिकेच्या लेखापरीक्षण विभागाच्या कार्यशाळेतील कर्मचाऱ्याने आक्षेप घेतला.

त्याअनुषंगाने मुख्य लेखा अधिकाऱ्यांनी प्रतिकिलोमीटर आठ रुपये या दराने खर्च वसूल करण्याच्या हालचाली सुरू केल्या. या संदर्भात बोलताना महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त भाग्यश्री बानाईत म्हणाल्या, की माझी नुकतीच नाशिक येथे नियुक्ती झाली असून अद्यापपर्यंत मला सरकारी निवासस्थान प्राप्त झालेले नाही.

त्यामुळे माझ्या पूर्वीच्या नियुक्तीच्या शिर्डी या ठिकाणीच माझे कुटुंब वास्तव्यास आहे. त्यामुळे मला कधी, कधी या ठिकाणी जावे लागते. अशा वेळेस मी सरकारी वाहनांचा वापर करताना नियमानुसार प्रतिकिलोमीटर आठ रुपये या दरानुसार भाडे भरणार आहे. मात्र, कारवाईच्या नावाखाली माझी प्रतिमा हनन करण्याचा हा प्रयत्न असून ही बाब दुर्दैवी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Education : विधान परिषदेत शिपायाच्या कंत्राटी पदावरून पेच; सत्ताधारी शिक्षक, पदवीधर आमदारांनीच केला सभात्याग

Ashadhi Ekadashi 2025: मुखात तुझे नाव, डोळ्यात तुझे गाव;डिगडोहमध्ये ‘विठ्ठल रखुमाईचा दर्शन सोहळा, माऊली ग्रुपचा उपक्रम

Ahilyanagar: 'श्रीरामपूरकरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्वागत'; ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष

Pune Crime : सोसायट्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर, कोंढव्यातील घटनेनंतर भीती; सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा यंत्रणेवरही प्रश्‍नचिन्ह

Ashadhi Wari 2025:'वरुणराजाच्या साक्षीने संत भेटीचा सोहळा'; बोंडले येथे संत तुकाराम महाराज व संत सोपानदेव महाराज यांची भेट

SCROLL FOR NEXT