IAS Bhagayshree Banayat esakal
नाशिक

NMC News: बानाईत यांच्याकडे आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार!

सकाळ वृत्तसेवा

NMC News : महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त भाग्यश्री बानाईत यांच्याकडे आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. स्वतःच्या अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळून आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळावा, असे शासन आदेशात म्हटले आहे. (bhagyashree banayat additional charge of commissioner NMC Nashik News)

डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार मसुरी येथे प्रशिक्षणासाठी गेल्यानंतर त्यांच्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. डॉ. पुलकुंडवार हे पुन्हा नाशिकमध्ये परतत असतानाच त्यांची साखर आयुक्तपदी बदली करण्यात आली.

त्यानंतर गमे यांच्याकडेच आयुक्त पदाचा पदभार कायम राहिला. श्री. गमे हे आठ दिवसाच्या रजेवर गेल्याने सध्या जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्याकडे आयुक्त पदाचा कार्यभार आहे. मागील दोन आठवड्यांपासून नाशिक महापालिकेला आयुक्त मिळत नसल्याने वाऱ्यावरची वरात असा महापालिकेचा कारभार सुरू आहे.

आयुक्त पदावर कोणाची नियुक्ती होईल, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले असतानाच शासनाने अतिरिक्त आयुक्त भाग्यश्री बानाईत यांच्याकडे त्यांच्या पदाचा कार्यभार सांभाळून आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला. नगर विकास खात्याचे उपसचिव शंकर जाधव यांनी यासंदर्भात महापालिकेला शुक्रवारी सायंकाळी उशिरा कळविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

SCROLL FOR NEXT