Bham dam overflows due to heavy rain in igatpuri esakal
नाशिक

भावलीपाठोपाठ भाम धरणही ओव्हरफ्लो! इगतपुरी तालुक्याला दिलासा

विजय पगार

इगतपुरी (जि. नाशिक) : प्रधानमंत्री सिंचन योजनेतून बांधण्यात आलेल्या इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते शिवारातील भाम धरण (Bham dam) सलग तिसऱ्या वर्षी ओव्हरफ्लो झाले आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असला, तरी या वर्षी पाऊस कमी झाल्याने धरण भरण्यास जवळपास १५ दिवसांचा विलंब झाला. दरम्यान, धरण ओव्हरफ्लो झाल्याने परिसरात आनंद व्यक्त होत असून, तालुक्याबरोबरच जिल्ह्याबाहेरही दिलासा मिळणार आहे.

भाम धरण निसर्गरम्यस्थळी आहे. गेल्या तीन वर्षांपूर्वी प्रधानमंत्री सिंचन योजनेतून या धरणाची उभारणी करण्यात आली आहे. भावली धरणापाठोपाठ (Bhavli Dam) दोन- चार दिवसांत भाम धरूनही ओसंडून वाहते. मात्र, या वर्षी तालुक्यातही पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने हे धरूनही संथ गतीने भरण्याचा मार्गक्रमण करीत होते. अडीच टीएमसी क्षमतेचे हे धरण केव्हा ओसंडून वाहते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून होते. शनिवारी (ता. २१) पहाटेपासून धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहू लागले.

गावांची तहान भागविणारे धरण

भाम धरणात अडीच टीएमसी साठा झाला आहे. धरणातून भाम नदीपात्राने दारणा नदीमार्गे दारणा धरणात विसर्ग होणार असून, नदीलगतच्या शेती सिंचनासाठी हे धरण संजीवनी देणारे ठरणार आहे. या भागातील गावांची तहान भागविण्यासाठी हे धरण उपयुक्त ठरणार आहे. पाण्याअभावी काळुस्ते भागांतील अनेक गावांत पारंपरिक हंगामी भात पीक वर्षानुवर्षे घेतले जात होते. मात्र, या धरणामुळे भाताबरोबरच बागायती पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढणार आहे. यामुळे आर्थिक सुबतत्ता देणारे हे धरण ठरणार असल्याचा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

सलग तिन्ही वर्षी ओव्हरफ्लो

गेल्या तीन वर्षांपूर्वी बांधलेले भाम धरण सलग तिन्ही वर्षी ओव्हरफ्लो झाले आहे. गेल्या दोन्ही वर्षी आषाढी एकादशीलाच धरण भरल्याचा विक्रम झाला. या वर्षी मात्र १५ दिवस उशिरा धरण भरले. धरण उशिरा भरल्याने धरणातील जलसाठा स्थिर झाल्याने ओसंडून वाहणारे पाणी हे काचेसारखे नितळ असल्याने समाधन व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune IT Company employee News : ‘कॅन्सर’ झाला म्हणून कर्मचाऱ्याला कामावरुनच काढलं? ; पुण्यातील प्रसिद्ध 'IT' कंपनीतील प्रकार

एसटी महामंडळाची ‘आवडेल तिथे प्रवास’ योजना! राज्यात, परराज्यातील प्रवासासाठी कमी केले २०० ते ८०० रुपयांनी सवलतीच्या पासची रक्कम, जाणून घ्या दर...

India Defeats Argentina Video : चक दे इंडिया..! भारताने संपवला नऊ वर्षांचा पदकाचा दुष्काळ ; ११ मिनिटांत चार गोल अन् अर्जेंटिना पराभूत

सोलापुरातील १०३ वर्षांचा रेल्वे ब्रिज पाडकाम! वाहतुकीसाठी मरिआई चौकातून शेटे नगराकडे दुचाकी, रिक्षांनाच परवानगी; शुक्रवारी खुला होणार ५४ मीटर रस्ता

ECHS Treatment Rule: उपचार नियम बदलणार! नवे दर लागू होणार, आरोग्य मंत्रालयाने मोठा निर्णय, कुणाला फायदा होईल?

SCROLL FOR NEXT