Bharat Ratna Rajiv Gandhi Udyan esakal
नाशिक

Nashik News : भारतरत्न राजीव गांधी उद्यान; समस्या नाही, निदान गावगुंडांना तरी आवरा!

सकाळ वृत्तसेवा

सिडको (जि. नाशिक) : प्रभाग २४ मधील भारतरत्न राजीव गांधी उद्यानात समस्या की समस्यांचे उद्यान म्हणावे, असा प्रश्न उपस्थित केला आहे. सुरक्षा कुंपण तुटलेल्या अवस्थेत असून, वारंवार प्रशासनास कळवूनही येथे दुरुस्ती करण्यात आलेली नाही. उद्यानातील कचरा एका ठिकाणी गोळा करून ठेवण्यात येतो. हा कचरा उचलून नेण्याची तसदी सफाई कर्मचारी घेत नसल्याचे आरोप नागरिक करत आहे.

रात्री मद्यपींचा धिंगाणा सुरू राहत असून परिसरातील रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असतो. तर हे मद्यपी येथील कचरा जाळून शेकोटी करताना दिसून येत असतात. रहिवाशांनी या गावगुंडांना हटकले असता त्यांच्याकडून शिवीगाळ करणे, अंगावर धावून जाणे असे प्रकार घडतात. येथे रात्री पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी होत आहे. (Bharat Ratna Rajiv Gandhi Udyan in bad condition at cidco ignorance of administration nashik news)

सुरक्षा कुंपण तुटलेले

भारतरत्न राजीव गांधी उद्यान, जगतापनगर, उंटवाडी

* उद्यान आवारात मद्यपींचा धिंगाणा, रात्री ओल्या पार्ट्या

* उद्यानात कचऱ्याचे साम्राज्य

* सुरक्षा कुंपण तुटलेले

* उद्यानात मद्याच्या फोडलेल्या बाटल्या.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

उद्यानात कचऱ्याचे साम्राज्य

"उद्यानात रात्री बाहेरील गावगुंड येऊन मद्यप्राशन करण्यास बसतात. अशा परिस्थितीत महिला आणि लहान मुलांना बागेत जाण्यास भीती वाटत आहे. याबाबत स्थानिक पोलिसांनी हस्तक्षेप करत अशांवर कठोर शासन करायला हवे." - संगीता आहेर, गृहिणी

"मद्यपी रात्री मद्यप्राशन करून येथील कचरा पेटवून देत शेकोटी करत असतात. घरातील वृद्धांना व लहान मुलांना या उद्यानाचा लाभ घेताच येत नाही." - योगिता काळे, गृहिणी

"उद्यान परिसरात सुरक्षा कुंपण तुटलेले असून येथे मोकाट श्वानांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. मनपा प्रशासनाने या बाबीकडे लक्ष द्यायला हवे."- सुचित्रा आहेर, गृहिणी

"उद्यानात खेळण्या व्यवस्थित असून चालत नाही. उद्यानास उद्यानाचा स्वरूपदेखील मिळायला हवं. येथे राहणाऱ्या रहिवाशांना गावगुंडांच्या भीतीने, स्वच्छतेच्या अभावामुळे उद्यानाचा वापर करता येत नाही." - देवयानी सूर्यवंशी, गृहिणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT