Scenes from the play Vishwamitra presented on Monday at Bharat Rang Mahotsav organized by National School of Drama and Nashik Municipality. esakal
नाशिक

Bharati Rang Mahotsav : नाट्य परंपरेचा इतिहास सांगणारे ‘विश्वामित्र’

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : भारतीय संस्कृती ज्या पद्धतीने महान आहे, त्याचप्रमाणे नाट्य परंपरादेखील इतिहासकालीन असल्याचे वास्तव मांडणारे विश्वामित्र हे नाटक सादर झाले. निमित्त होते, भारत रंग महोत्सवाचे. (Bharati Rang Mahotsav Vishwamitra tells history of theater tradition art play drama nashik news)

महाकवी कालिदास कलामंदिर येथे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातर्फे सुरू असलेल्या भारंगममध्ये सोमवारी (ता. २०) विश्वामित्र हे नाटक सादर झाले. ब्रिजेश के वर्मन यांच्या कादंबरीवर आधारित असलेले हे हिंदी नाटक प्रा. अफसर हुसेन यांनी लिहिले आहे.

विजयकुमार नाईक यांनी मराठी अनुवाद केला आहे. अभिनय, संगीत, गीत, मंचाची सुरेख रचना, वेशभूषा यातून शास्त्रीय नाट्याची आठवण प्रकर्षाने होते. विश्वामित्राची भूमिका दीपक अमोणकर यांनी साकारली आहे.

तर, इंद्र म्हणून सतीश नार्वेकर, मेनका व तडका यांची भूमिका वैशाली पाईककोडे यांनी आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. इतिहासकालीन नाट्याची साक्ष देणाऱ्या या नाटकाद्वारे भारतीय परंपरा व नाट्य कला हीदेखील प्राचीन असल्याचे सुंदर वर्णन करण्यात आले आहे.

दोन तासांच्या नाटकात पूर्वार्ध व उत्तरार्ध अशा स्वरूपात नाटकाची मांडणी करण्यात आली आहे. प्रसाद कलंगुटकर यांनी लाइट डिझाइन केले. तर, योगेश कापडी यांनी सेट डिझाईन केले आहे. संगीत, मेकअपची योग्य सांगड घातल्यामुळे प्रेक्षकांना खेळवून ठेवण्यात दिग्दर्शकांना यश प्राप्त झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT