Rape Sakal
नाशिक

भोंदूबाबाचा आईसह तिन मुलींवर बलात्कार | Nashik

संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : तुमच्या मुलीला जादूटोणा झाला आहे सांगत भोंदूबाबा व त्याच्या भाऊ आईसह तिच्या तिन्ही मुलींवर सलग दोन वर्षांच्या पासून बलात्कार करायचा. या संदर्भात दोन जणांवर बलात्कार तसेच धमकी देऊन पैसे उकळण्या संदर्भात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी या भोंदूबाबा व त्याच्या भावास ताब्यात घेतले आहे.

धर्मांतरासाठी केले प्रवृत्त

मुलीचे लग्न जमत नसल्याने तालुक्यातील नागडे गावातील एका बाबाकडे गेली असता बाबाने मुलीला जादूटोणा झाला आहे असे सांगत आईसह तिन्ही मुलींना पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध देऊन तसेच वेळोवेळी चाकूचा धाक दाखवत फिर्यादी मुलीवर बलात्कार करून त्याचा व्हिडीओ काढून आई व इतर दोन मुलींवर सातत्याने अत्याचार केले. संशयित आरोपी सुफी अजीज अब्दुल बाबा व जब्बार शेख या दोघांनी तब्बल दोन वर्षे ४ महिने वेळोवेळी आई व त्याच्या तिन्ही मुलींनर बलात्कार करून ब्लॅकमेल करत पैशाची मागणी देखील केली. तसेच एका मुलीस हिंदू धर्माबद्दल द्वेष निर्माण करून मुस्लिम बनण्यास प्रवृत्त केले. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

भोंदूबाबाला अटक करुन घेवून जाताना पोलिस.

येवला शहर पोलिस अधिक तपास करीत आहेत. मनमाड उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंग साळवे, पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी याप्रकरणी भेट देऊन माहिती घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

Pune Nashik Highway Accident: पुणे-नाशिक मार्गावर कंटेनर-ट्रकचा अपघात; एकाचा मृत्यू, एकलहरे येथे वाहतूक कोंडी!

SCROLL FOR NEXT