bhushan deore 123.png 
नाशिक

जिद्द, मेहनत, चिकाटीवर भूषण देवरेंची उपनिरीक्षकपदाला गवसणी!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / नामपूर : जिद्द, मेहनत, चिकाटी असेल, तर यश निश्‍चित मिळते. याची प्रचीती पारनेर (ता. बागलाण) येथील भूषण देवरे यांनी अधोरेखित केली. भूषणने 2018 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत राज्यात इतर मागास प्रवर्गात 40 वी रॅंक मिळविली. पारनेर गावातील पहिलाच अधिकारी होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. 
भूषणचे प्राथमिक शिक्षण ताहाराबाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी पूर्ण केले.

उपनिरीक्षकपदाला गवसणी 

बारावीला प्रथम श्रेणी मिळाल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले. पदवीसाठी पुण्यात प्रवेश घेतला. महाविद्यालयीन शिक्षण घेताना नेट-सेट परीक्षा ते उत्तीर्ण झाले. त्यामुळे स्पर्धा परीक्षेबाबत त्यांचा आत्मविश्‍वास वाढला. इतिहास विषयाची एमएची पदवी त्यांनी घेतली. त्यांनी कोणताही क्‍लास न लावता दिवसाकाठी दहा ते बारा तास मुद्देसूद अभ्यासावर लक्ष केंद्रित करून यशाला गवसणी घातली. भिलवाड (ता. बागलाण) येथील गोमुखेश्‍वर माध्यमिक विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक सुरेश देवरे यांचे ते पुत्र आहेत. आगामी काळात राज्य सेवेची परीक्षा देण्याची त्यांची इच्छा असून, आई, वडील व शिक्षकांच्या संस्कारांच्या शिदोरीमुळे आपण यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. 

हेही वाचा > माणसातच शोधा आता देव...कारण, 'मंदिर'च बंद!...इतिहासात घडतंय पहिल्यांदाच
इच्छा तेथे मार्ग असतो... 
ग्रामीण भागातील मुलांमध्ये गुणवत्ता असूनही केवळ मार्गदर्शनाअभावी मुले मागे पडतात. इच्छा तेथे मार्ग असतो, हे सतत लक्षात ठेवून कोणत्याही एका क्षेत्रात करिअर करण्याचा ध्यास घेतला, तर यश नक्कीच पदरी पडते. आजच्या स्पर्धेच्या युगात तरुणांनी पारंपरिक अभ्यासक्रमांपेक्षा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यशाचा मार्ग सुकर करावा. ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेतील इच्छुक असणाऱ्या तरुणांना मोफत मार्गदर्शन करेन. -भूषण देवरे, पोलिस उपनिरीक्षक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT