bhushan kasaliwal.jpg 
नाशिक

चांदवड नगरपरिषद निवडणूक: भाजप नगरसेवकांना भूषण कासलीवाल यांचा 'व्हीप'; बैठकीत ठरणार आगामी राजकारणाची दिशा

हर्षल गांगुर्डे

गणुर (जि.नाशिक) : चांदवड नगरपरिषद निवडणुक काही महिन्यावर असताना पालिकेचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. गेली काही वर्षे भूषण कासलीवाल यांच्या नेतृत्वाखाली काढल्यानंतर आता त्यांच्याच विरोधात अविश्वास ठराव प्रक्रियेत खुद्द भाजप नगरसेवकांनी सहभाग दर्शविल्याने आता भाजपाचे गटनेता या हक्काने उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी संबधित नगरसेवकांना 'व्हीप' अर्थात पक्षादेश बजावला आहे. 

पक्ष विरोधी काम करू नये अशा आशयाचा व्हीप

चांदवड नगरपरिषद निवडणूकी पूर्वीचं रंगलेले राजकारण प्रत्यक्ष निवडणूक कालावधीत किती 'हाय व्होल्टेज' होणार याची चुणूक नुकतीच चांदवडकरांना दिसली. निमित्त आहे उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्या विरोधात आणलेला अविश्वास ठराव व या प्रक्रियेत खुद्द त्यांच्याच (भाजपा) पक्षाच्या नगरसेवकांनी घेतलेला सहभाग याबाबत चांदवड नगरपरिषदेत उद्या म्हणजेच (ता. १६) शुक्रवारी बैठक बोलविण्यात आली आहे. मात्र या बैठकीस उपस्थित राहू नये व पक्ष विरोधी काम करू नये अशा आशयाचा व्हीप पक्षादेश भूषण कासलीवाल यांनी नोटीस द्वारे पार्वताबाई पारवे, इंदूबाई वाघ, सुनीता पवार, शालिनी भालेराव, जयश्री हांडगे या नगरसेविकांना बजावला आहे.

पालिकेच्या आगामी राजकारणाची दिशा ठरणार

२०१५ साली भाजप गटातील या पाच नगरसेविका व भूषण कासलीवाल यांनी आपल्या गटाची स्थापना जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. गटनेता म्हणून कासलीवाल यांची नोंद केली आहे. यामुळे उद्या म्हणजेच ता. १६ शुक्रवारी होणाऱ्या विशेष बैठकीस उपस्थित राहू नये व पक्षविरोधी काम करू नये असा व्हीप कासलीवाल यांनी बजावला आहे. शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत वरील नगरसेविकांनी पक्षादेश न मानता त्याचे उल्लंघन केल्यास सदस्य महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियमानुसार जिल्हाधिकारी यांच्याकडून होणाऱ्या व अपात्रतेच्या कारवाईस पात्र राहतील असाही उल्लेख कासलीवाल यांनी केला आहे. यामुळे उद्याच्या विशेष बैठकीत काय होईल यावर पालिकेच्या आगामी राजकारणाची दिशा ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price Update : सोने ४ हजार तर चांदी १५ हजारांनी घसरली, पण पुन्हा दर वाढले; मागच्या चार दिवसांतील जाणून घ्या स्थिती

Social Media Ban India : अल्पवयीन मुलांना मोठा धक्का! आता नाही वापरता येणार इंटरनेट; 'या' राज्यांनी घातली सोशल मिडियावर बंदी

Raj Thackeray: ‘राज’कारणाची लवचिक खेळी! कल्याण-डोंबिवलीतील सत्तासूत्रामुळे ठाकरे व्यथित

Mumbai Local: विकेंडला मुंबईकरांचे हाल होणार! तिन्ही लोकल मार्गांवर मेगाब्लॉक, वेळापत्रकात मोठे बदल

Gadhinglaj Leopard : बिबट्या की दुसरा वन्यप्राणी? रात्री शेतात हॅलोजनचा उजेड; शेतकरी जागा, पण वनखाते झोपेत

SCROLL FOR NEXT