The deplorable state of Nampur road. esakal
नाशिक

Nashik : बिजोरसे- नामपूर रस्त्याची दैना; काटेरी बाभळींमुळे साईडपट्ट्याही लुप्त

सकाळ वृत्तसेवा

बिजोरसे (जि. नाशिक) : यंदा मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे मोसम खोऱ्यातील रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. बिजोरसे ते नामपूर रस्त्याचीही दयनीय अवस्था झाली आहे. मोठमोठे खड्डे पडल्याने छोटे- मोठे अपघात होत आहेत. परिणामी, वाहनचालकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या काटेरी बाभळींमुळे साईडपट्ट्या लुप्त झाल्या असून, समोरुन येणारी वाहने दिसत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने याप्रश्‍नी तातडीने लक्ष देऊन सुधारणा करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (Bijorse Nampur road deplorable Nashik News)

शेतीकामे जोरात सुरू झाल्याने शेतकऱ्यांची व वाहनांची वर्दळ असते. दिवाळीनंतर रब्बी हंगाम सुरू होणार असून, मळगाव, मोराणे, कजवाडे, चिंचवे आणि अंबासन येथून शेतकरी नामपूरला जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात. अशा परिस्थितीत संभाव्य दुर्घटना रोखण्यासाठी खड्डे बुजविणे गरजेचे आहे. आजूबाजूची झुडुपे इतकी वाढली आहेत की केव्हाही अपघात होऊ शकतो. बांधकाम विभागाकडून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. अनेकवेळा निवेदने, आंदोलन करूनही रस्ता दुरुस्ती केली जात नाही.

नागरीकांच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचा आरोप केला जात आहे. या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करावे, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता आंदोलन करण्याचा इशारा बागलाण तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सम्राट काकडे, रावसाहेब काकडे, निकुंभ मोरे, पप्पू मोरे, शिवसेनेचे अरुण मोरे, कैलास काकडे, सुदाम कोर, पंकज मोरे, समाज प्रबोधन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. रवींद्र मोरे, सरपंच राजेंद्र मोरे, योगेश काकडे, धनंजय मोरे, विलास मोरे, निलेश काकडे, दिनेश मोरे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election साठी भाजप-शिवसेना एकत्र, पण राष्ट्रवादीचा उल्लेख नाही, जागावाटपाचा फॉर्म्युलाच सांगितला!

Dhurandhar Craze in Pakistan: पाकिस्तानात ‘धुरंधर’ पाहण्याची क्रेझ! बंदी असतानाही लोक कसे पाहतायत चित्रपट?

Kolhapur Property Survey : करवीर तालुक्यात ऐतिहासिक सर्वेक्षण; १३२ गावांतील ४० हजार मिळकतींना युनिक ओळख

Agriculture News : नाशिकमध्ये रब्बी पीकविम्याला थंडा प्रतिसाद! ४ लाख शेतकरी विम्यापासून दूर; काय आहे कारण?

Latest Marathi News Live Update : वर्धेच्या देवळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा

SCROLL FOR NEXT