Accident  sakal
नाशिक

Nashik Accident News : कंटेनरला धडकून दुचाकीस्वार ठार; एक गंभीर

सकाळ वृत्तसेवा

Nashik Accident News : ट्रॅक्टर हाऊस परिसरात उड्डाणपुलावर उभ्या कंटेनरला दुचाकी मागून धडकल्यामुळे दुचाकीस्वार जागीच ठार, तर एक गंभीर जखमी झाला. शनिवार (ता.२२) रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. आकाश कैलाश कोटकर (२२, रा. पिंपळगाव बसवंत), असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वारांचे नाव आहे.

उड्डाणपुलावरून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर (एमएच- ४६- एआर- ०९०५) शुक्रवार (ता. २१) रात्री नादुरुस्त झाला. (Bike rider killed after hitting container Nashik Accident News)

त्यामुळे कंटेनर रात्रीपासून उभा होता. शनिवार दुपारी अडीचच्या सुमारास पिंपळगाव बसवंत येथील इस्लामपुरा मोहल्ला येथील दोन तरुण दुचाकीवरून (एमएच- १५- जेएफ- ३८९३) मुंबईच्या दिशेने जात होते.

त्यांची दुचाकी उभ्या कंटेनरला मागून धडकली. यात दुचाकीस्वार आकाश कैलाश कोटकर याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहे. भद्रकाली पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत घटनेची माहिती घेत पंचनामा केला.

काही वेळ या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. मृताच्या आधारकार्ड मिळून आल्याने त्याची ओळख पटली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दुसऱ्या तरुणाची मात्र उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती. शिवाय त्याचीही प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. पिंपळगाव बसवंत येथील एक तरुण मुंबई येथून परत येत असताना अपघात झाल्याचे निदर्शनात आले.

आधार कार्डवरून मृताची ओळख पटल्याने त्या प्रवासी तरुणाने मृताची आई पिंपळगाव बसवंत येथील एका हॉटेलवर काम करत असल्याने हॉटेलच्या मालकास फोन करून माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांना घडलेल्या प्रकाराची माहिती मिळाली.

उड्डाणपुलावरील दुचाकी बंदीचा फार्स

उड्डाणपुलावर दुचाकीस बंदी आहे. असे असताना सर्रास दुचाकीचालक उड्डाणपुलाचा वापर करताना आढळून येतात. त्यामुळे अशा प्रकारचे अपघात घडत असतात. यापूर्वी अशा प्रकारचे अनेक अपघात या ठिकाणी घडले आहे. वाहतूक पोलिसांकडून याकडे डोळेझाक केली जात असल्याने अशा प्रकारच्या अपघातास निमंत्रण मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT