Accidental bike esakal
नाशिक

Nashik Accident News : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; लासलगाव- विंचूर रस्ता बनला मृत्यूचा सापळा

लासलगाव-विंचूर रस्त्यावरील मंजुळा पॅलेसजवळ दुचाकीस्वारास ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली अन...

सकाळ वृत्तसेवा

लासलगाव : लासलगाव-विंचूर रस्त्यावरील मंजुळा पॅलेसजवळ दुचाकीस्वारास ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी (ता. २९) रात्री दहाच्या सुमारास घडली.

या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार रामदास घुमरे तपास करीत आहेत. (Bike rider killed in collision with truck Lasalgaon Vinchur road become death trap Nashik Accident News)

धारणगाव खडक येथील राहुल सुधाकर कानमहाले (वय ३१) दुचाकीवरून (एमएच १५, एफडब्ल्यू ४७६१) लासलगावकडून विंचूरकडे जात होता.

मंजुळा पॅलेसजवळ पाठीमागून येत असलेल्या ट्रकने (एमएच १८, एडी ५७६०) दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार राहुल कानमहाले जागीच ठार झाला.

दरम्यान, लासलगाव-विंचूर रस्ता मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होऊन अनेक लोकांचा बळी गेला आहे.

लासलगाव-विंचूर रस्त्याचे चौपदरीकरण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र, त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. या रस्त्यावरून मोठी वर्दळ असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

"लासलगाव-विंचूर रहदारीचा रस्ता असून, अपघातांचे प्रमाण वाढत आहे. या रस्त्याचे चौपदरीकरण व्हावे, या रोडवर कांद्याचे खडे व टोल वाचविण्याच्या दृष्टीने मोठी वर्दळ असते. यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. संबंधित खात्याने याकडे लक्ष देऊन लवकर चौपदरीकरण करावे."- संतोषशेठ पलोड, उद्योजक, लासलगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT