bike thief esakal
नाशिक

शहर परिसरातील दुचाकी चोरीचे प्रकार सुरूच; पोलिसांना अपयश

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : शहर व परिसरातील दुचाकी चोरीचे (Bike Theft) प्रकार सातत्याने सुरूच आहेत. शहरातील एखाददोन भुरटे चोर वगळता दुचाकी चोरट्यांची टोळी पकडण्यात अद्यापही पोलिसांना यश आलेले नाही. शहराजवळील दाभाडीसह छावणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तीन दुचाकी चोरीचे प्रकार घडले. आठवडाभरात तीन दुचाकी चोरीचे प्रकार घडल्याने दुचाकीधारक त्रस्त झाले आहेत. गर्दीच्या ठिकाणी दुचाकीधारकांना अनेकांच्या मनात दुचाकी चोरी होईल की काय, या शंकेने घर केले आहे. (bike theft continue in the city area Failure to police Nashik Crime News)

शहरातील जुना आग्रा रस्त्यावरील चैतन्य हॉस्पिटलसमोरून गणेश शेवाळे (वय २६, रा. टेहेरे) यांच्या मालकीची सुमारे २५ हजार रुपये किमतीची हॅन्डल लॉक करून ठेवलेली एचएफ डिलक्स दुचाकी (एमएच ४१, एएम ६१८५) चोरट्यांनी लंपास केली. जुन्या महामार्गावरच निसर्ग हॉटेलसमोर दुसरा दुचाकी चोरीचा प्रकार घडला. अय्युब मेहताब खान पठाण (५८, रा. देवळाली, नाशिक) या सेल्समनची सुमारे १५ हजार रुपये किमतीची हीरो होंडा स्प्लेंडर दुचाकी (एमएच २०, एझेड ९९३०) चोरट्यांनी चोरून नेली. तालुक्यातील दाभाडी येथील मुंजोबा चौकातून स्वप्नील निकम (३५, रा. दाभाडी) या तरुणाची २५ हजार रुपये किमतीची होंडा शाइन (एमएच ४१, डब्ल्यू ८८२४) चोरट्यांनी पळविली.

दुचाकी मालकांनी दोन-तीन दिवस शोध घेऊनही या दुचाकी मिळून न आल्याने छावणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी सुमारे ५५ हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी चोरी प्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. छावणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतूनच सर्वाधिक दुचाकी चोरीला जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arif Khan Chishti : मुस्लिम तरुणाचा मोठा निर्णय! संत प्रेमानंद महाराजांना किडनी दान करण्याची तयारी, वाचा कोण आहे आरिफ खान?

Whatsapp Mirror : व्हॉट्सअ‍ॅपवर एक परमिशन अन् बँक अकाऊंट रिकामं, 'हे' फेमस फीचर ठरतंय मोबाईल हॅकिंगचं कारण

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT