Sudham Demsey and colleagues tending to an unconscious party. esakal
नाशिक

Nashik News: लग्नातील फटाक्यांच्या आवाजाने पक्षी बेशुद्ध : सुदाम डेमसे

संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर : पाथर्डी फाटा येथे हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये एका विवाह समारंभादरम्यान दुपारी बाराच्या सुमारास फटाक्यांच्या आतषबाजीमुळे परिसरातील इमारतींना अक्षरशः हादरे बसून आवाजाने उडणारे पक्षी देखील बेशुद्ध होऊन खाली पडल्याने संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी माजी नगरसेवक सुदाम डेमसे यांनी केली आहे. (Birds fainted at sound of wedding firecrackers at express inn hotel Sudam Demse Nashik News)

रविवारी (ता. ३१) दुपारी बाराच्या सुमारास प्रचंड मोठा आवाज आणि सोबत धुराचे लोळमुळे केवळ हॉटेल परिसरच नाही तर प्रशांतनगर, मुरलीधरनगर, वासननगर, समर्थनगर भागातील नागरिक देखील आश्चर्यचकित झाले.

एका मोठ्या लग्नाच्या निमित्ताने ही फटाक्यांची आतषबाजी होत आहे, हे समजल्यानंतर नागरिक हैराण झाले. अनेकांनी घरांना हादरे बसल्याचे, तर एक्स्प्रेसच्या बाजूला असलेल्या डेमसे मळा भागात रॅकवरील भांडी देखील पडल्याच्या तक्रारी नागरिकांनी माजी नगरसेवक सुदाम डेमसे यांच्याकडे केली.

त्यांनी हॉटेल प्रशासनाला याबाबत विचारणा केली असता, आम्ही परवानगी घेतली आहे, असे उत्तर त्यांना देण्यात आले. या आवाजामुळे प्रशांतनगर येथे उडणारे काही पक्षी बेशुद्ध होऊन खाली कोसळले.

पक्ष्यांना नागरिकांनी प्रथमोपचार करत सोडले. रहिवासी भागात फटाक्यांच्या आवाज किती डेसिबलपर्यंत असावेत याची नियमावली आहे. मात्र आज झालेल्या फटाक्यांच्या आवाजामुळे हे सर्व नियम गुंडाळून ठेवले आहेत की काय, अशा संतप्त प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी नोंदविल्या आहेत.

"एक्स्प्रेस इन हॉटेलमधील हा विवाह मोठ्या राजकीय परिवाराच्या घरातील होता, असे समजते. हॉटेल प्रशासनाने आवाजाबाबत उर्मटपणे उत्तर दिले. त्यामुळे इंदिरानगरचे वरिष्ठ निरीक्षक नितीन पगार यांना याबाबत माहिती दिली. आवाजाच्या मर्यादांची नियमावली आहे. पक्षी,ज्येष्ठ नागरिक आणि बालकांना या कानठळ्या बसविणाऱ्या फटाक्यांच्या आवाजाचा मोठा त्रास झाला आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे."- सुदाम डेमसे, माजी नगरसेवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Bhor Police : ५८ पैकी २९ पोलिस कार्यरत, ५० टक्के जागा रिक्त; भोर पोलिस ठाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT