Corona-19 third wave  sakal
नाशिक

नाशिक : तिसऱ्या लाटेसाठी ‘बिटको रुग्णालय' सज्ज

बिटकोतील एक हजार रुग्णांना ऑक्सिजन पुरवणारा १९ केएलचा ऑक्सिजन प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : कोरोना संभाव्य तिसरी लाट (Corona-19 third wave) येण्याची शक्यता गृहीत धरून नाशिक रोडच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयात तयारी सुरू आहे. बिटको रूग्णालयात पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागली आहे.

बिटकोची कोविड रुग्ण क्षमता एक हजाराची आहे. शहरात रुग्ण संख्या वाढत असल्याची माहिती डॉ. जितेंद्र धनेश्वर यांनी दिली. बिटकोतील एक हजार रुग्णांना ऑक्सिजन पुरवणारा १९ केएलचा ऑक्सिजन प्रकल्प असून, त्याच्या जोडीला आणीबाणीसाठी तीन केएल क्षमतेचा प्रकल्प सज्ज आहे. एमआरआय सेंटर लवकर सुरू होणार आहे. सीटी स्कॅन, कोरोना विषाणू तपासणी करणारी मॉलिकयुलर लॅब सुरू आहेत. आणीबाणी लक्षात घेऊन उत्तरेकडील प्रवेशद्वारावर रॅम्प, दक्षिणेकडील पर्यायी प्रवेशद्वार उघडे करणार आहे. गरजेनुसार पर्यायी लिफ्ट सुरू करणार असून, आवश्यकतेनुसार आरोग्य व अन्य कर्मचारी संख्या वाढविणे गरजचे असल्याचे डॉ. धनेश्वर यांनी सांगितले. बिटकोत १५ ते १८ वयोगटातील तीन हजार मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT