Dr. Bharati Pawar
Dr. Bharati Pawar esakal
नाशिक

BJP Mission 2024 : डॉ. भारती पवार यांची नाशिक लोकसभेत Entry

सकाळ वृत्तसेवा

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने ‘मिशन- २०२४’ हाती घेतले असून, या अंतर्गत राज्यातील १७ लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. याचाच भाग म्हणून केंद्रीय मंत्र्यांचे राज्यातील १७ लोकसभा मतदारसंघांत भाजप पक्षबांधणीसाठी दौरे सुरू झाले आहेत. यात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे नाशिक लोकसभा मतदारसंघाची धुरा सोपविण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघात स्वबळावर उमेदवार देण्याची तयारी सुरू झाली आहे. पक्षबांधणीच्या माध्यमातून उमेदवारांची चाचपणी होणार आहे. (BJP Mission 2024 Dr Bharti Pawar Entry in Nashik Lok Sabha Nashik political news)

भाजप व शिवसेनेची युती असताना नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला, तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघ भाजपच्या वाटेला येत होता. २०१४ व २०१९ च्या लोकसभा दोन्ही पक्षांनी युतीत लढल्या. मात्र, शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर भाजप व शिवसेना युती तुटली. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार बरोबर घेऊन भाजपसमवेत सरकार स्थापन केले.

भाजपने राज्यात प्रामुख्याने स्वबळाचा नारा देत शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय मंत्र्यांची देशभरात लोकसभा प्रवास योजना सुरू असून, पक्षबांधणीसाठी त्याचा उपयोग होत आहे. त्या धर्तीवर राज्यातील केंद्रीय मंत्र्यांच्या १७ लोकसभा मतदारसंघांत प्रवास दौऱ्यांची आखणी करण्यात आली आहे. त्यामुळे संघटना अधिक बळकट होणार असल्याचे पक्षाकडून सांगितले जात आहे. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी अकोला, अमरावती, वर्धा, रामटेक, भंडारा, गडचिरोली आणि यवतमाळ या लोकसभा मतदारसंघांचे प्रभारी असतील.

हेही वाचा : वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

पीयूष गोयल यांच्याकडे ठाणे आणि उत्तर-पश्चिम मुंबई या मतदारसंघांची जबाबदारी असेल. नारायण राणे यांच्याकडे सांगली, रावसाहेब दानवे यांच्याकडे लातूर व मावळ, डॉ. भागवत कराड यांच्याकडे परभणी व धुळे, डॉ. भारती पवार यांच्याकडे नाशिक आणि कपिल पाटील यांच्याकडे रावेर आणि सोलापूर या मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे. हे केंद्रीय मंत्री महिन्यातून एकदा संबंधित लोकसभा मतदारसंघात एक दिवसाचा दौरा करतील. त्यामध्ये संघटनात्मक आढावा घेतील तसेच सार्वजनिक स्वरूपाच्या कार्यक्रमात सहभागी होतील.

नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत गोडसे यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अनेकदा हस्तक्षेप केला आहे. तसेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांना डावलण्याचाही प्रयत्न केला. मात्र, डॉ. पवार यांनी कधीही नाशिक लोकसभा मतदारसंघात लक्ष घातले नाही. मात्र, आता पक्षानेच डॉ. पवार यांच्यावर नाशिकची जबाबदारी दिल्याने यानिमित्ताने त्यांची नाशिक लोकसभेत ‘एन्ट्री’ झाली आहे. या मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election: भारताच्या निवडणुकीत अमेरिका खरंच हस्तक्षेप करत आहे का? वाचा, रशियाच्या आरोपावर अमेरिकेने काय दिले उत्तर

IPL 2024 Playoffs: मुंबईपाठोपाठ पंजाबचंही आव्हान संपलं, आता प्लेऑफची शर्यत 8 संघात; जाणून घ्या समीकरण

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Live Update : श्री केदारनाथ धामवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

Voter Slip : मतदार यादीत नाव शोधण्यापासून सुटका ; पहिल्यांदाच स्मार्ट व्होटर स्लिप उपक्रम

SCROLL FOR NEXT