Political-Party
Political-Party esakal
नाशिक

नाशिक महापालिका निवडणूक | भाजप, मनसेकडून धडका मारण्याचे काम सुरू

विक्रांत मते

नाशिक : अनेक वर्षांपासून शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला असलेल्या या भागात शिवसेनेचेच वर्चस्व राहणार असल्याचे दिसत असले, तरी भारतीय जनता पक्ष (BJP) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) धडका मारण्याचे काम सुरू आहे. त्यातून दोन्ही पक्षांना यश मिळाल्यास विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेसाठी मोठा धक्का राहील. माकपलाही या प्रभागात विजयाची संधी असून, मागील निवडणुकीत लुप्त पावलेला लाल बावटा पुन्हा फडकल्यास हाही उजव्या विचारसरणीला धक्का देणारी बाब ठरेल.

मनसेचे इंजिन धावेल का, या कडे सर्वांचे लक्ष

सिडको विभागातील लक्षवेधी लढतींपैकी एक लढत या भागात होणार आहे. त्याला महत्त्वाचे कारण म्हणजे या भागात सर्वच पक्षांची कमी-अधिक प्रमाणात ताकद आहे. शिवसेनेपासून विचार केल्यास ठाकरे यांच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळेच या भागात अनेक वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकत आहे. भाजपला या भागात संमिश्र यश मिळत असले, तरी गेल्या काही वर्षांत वाढलेली ताकदही मोठी उपलब्धी मानता येईल. त्यामुळे या भागातून लढण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. मात्र, शिवसेनेकडे जेवढे इच्छुक आहेत, तेवढे इच्छुक भाजपकडे अद्याप तरी नाहीत. मात्र, राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष असल्याने इच्छुक तयार व्हायला वेळही लागणार नाही हेही तितकेच खरे आहे. मनसेचे महानगरप्रमुख या भागातून निवडणूक लढविणार आहे. २०१२ च्या पंचवार्षिकमध्ये मनसेला येथील मतदारांनी भरघोस मतांची साथ दिली. मात्र, मतांचा टेम्पो टिकविता आला नाही. आता महानगरप्रमुखांच्या रूपाने मनसेचे इंजिन धावेल का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

महापालिका हद्दीत माकपने चार नगरसेवकांपर्यंत बाजी मारली आहे. छोटेखानी का होईना या पक्षाने आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे. २०१७ च्या निवडणुकीत माकपचा सूपडा साफ झाला होता. मात्र, पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने यंदा माकपला संधी वाटते. अनेकांना संधी दिसत असल्याने या प्रभागातील लढती रंगतदार होतील. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीची दिशा यानिमित्ताने ठरणार आहे. या भागाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नाशिकचा ग्रामीण भाग या प्रभागात वास्तवाला आहे. त्यामुळे स्थानिक प्रश्‍नांबरोबरच ग्रामीण भागातील प्रश्‍न येथे चर्चेला येतील. खानदेश व कसमादे भागातील मतदान परिणामकारक ठरते.

हे आहेत इच्छुक

-सुवर्णा मटाले, दीपक दातीर, अलका अहिरे, हर्षदा गायकर, दिलीप दातीर, ॲड. तानाजी जायभावे, सुधाकर जाधव, निर्मला पवार, सोनाली खुटवड, मोहिनी पवार, मकरंद वाघ, याग्निक शिंदे, विद्या चौधरी, सीमा वाघ, अरुणा दातीर, अविनाश पाटील, अशोक पवार, ॲड. नीलेश पाटील, चेतन हांडगे, तन्मय गांगुर्डे, डॉ. अमृत सोनवणे, गोकुळ तिडके, चेतन कासव, सोनल तिडके, डॉ. अमृत सोनवणे, अजय ठाकूर, राज कुमावत, प्रसाद ठाकरे.

प्रभागाची व्याप्ती : खुटवडनगर, कार्तिकेयनगर, कृष्णनगर, जनकनगरी, केवल पार्क, अजमेरीनगर.

*उत्तर : सातपूर अंबड लिंक रोडवरील नंदिनी नदीवरील पुलापासून नंदिनी नदीने आयटीआय पुलापर्यंत. पुढे नंदिनी नदी महालक्ष्मी एजन्सीच्या इमारतीमागील भागापर्यंत.

*पूर्व : महालक्ष्मी एजन्सीच्या इमारतीमागील नंदिनी नदीपासून ब्रह्मणी अपार्टमेंट सोडून रस्त्यापर्यंत. पुढे डावीकडील रस्त्याने सुनील फॅब्रिकेशनपर्यंत. सुनील फॅब्रिकेशन घेऊन रस्त्याने दक्षिणेकडे देवराम पाटील बुवा गार्डनमार्गे डावीकडे मीनल अपार्टमेंट घेऊन व कृष्णदर्शन अपार्टमेंट सोडून दोन्ही इमारतींमधून नाल्यापर्यंत. पुढे नाल्याने मथुरा लॉन्सपर्यंत, मथुरा लॉन्स घेऊन कामटवाडे रस्त्यापर्यंत, माउली लॉन्सकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नाल्याच्या पुलापर्यंत. पुढे उजवीकडे रस्त्याने उत्तरेकडील भाग घेऊन दत्तमंदिरापर्यंत. डीजीपीनगरचा भाग घेऊन देवकीनंदन गोशाळा सोडून, आशापुरी अलंकारासमोरील कामटवाडे-अंबड रस्त्यावरील चौकापर्यंत. पुढे कामटवाडे-अंबड रस्त्याने सातपूर-अंबड लिंक रोडवरील हॉटेल माउलीसमोरील चौकापर्यंत.

*दक्षिण : हॉटेल माउलीसमोरील सातपूर-अंबड लिंक रोडवरील चौकापासून एक्स्लो जंक्शनपर्यंत.

*पश्चिम : एक्स्लो जंक्शनपासून सातपूर-अंबड लिंक रोडवरील नंदिनी नदीवरील पुलापर्यंत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : अमेरिका, कॅनडा अन् अरब देशांकडून 'आप'ला फंडिंग; ED कडून गृहमंत्रालयाला अहवाल

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंबईतील विले पार्ले येथील शाळेत बरोबर ६ वाजता मतदान बंद

Gadchiroli News : कधी वाघ, कधी हत्ती...सोसायचे किती? ग्रामस्थ भयछायेत; जंगलात तेंदूपाने संकलन करताना जीव मुठीत!

Ebrahim Raisi: इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

SCROLL FOR NEXT