BJP esakal
नाशिक

BJP News : ‘विभाजन विभीषिका दिवस’ पाळणार; भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा

BJP News : १४ ऑगस्टला ‘विभाजन विभीषिका दिवस’ पाळला जाणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी दिली.

वसंतस्मृती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

देशाचे विभाजन झाल्याने वेदनांच्या स्मरणासाठी, फाळणी वेळी ज्यांनी प्राण गमावले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन भंडारी यांनी केले. (BJP State Vice President informed that Partition Vibhishika Diwas will be observed on August 14 nashik news)

२० फेब्रुवारी १९४७ या दिवशी ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट एटली यांनी स्वातंत्र्याचा निर्णय जाहीर केला. ३० जून १९४८ पूर्वी देश सोडण्याचे ब्रिटिशांनी जाहीर केले.

मात्र, त्याआधी देशाची फाळणी केली. भारत आणि पाकिस्तान असे दोन देश निर्माण करून अखंड भारताच्या नकाशाला छेद दिला. ही कृती कधीच विसरता येणार नाही. स्थलांतराच्या काळात हिंसाचार होऊन जवळपास सव्वा कोटी नागरिकांना सर्वस्व गमवावे लागले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सुमारे ६० लाख बिगर मुस्लिमांनी पश्चिम पाकिस्तानातील आपली घरेदारे सोडून भारतात पळ काढला, तर २० लाख बिगर मुस्लिमांनी पूर्व पाकिस्तानातून घरेदारे सोडून भारतात स्थलांतर केले. या प्रक्रियेत पाच लाखांहून अधिक नागरिकांची हत्या झाली, असे भंडारी म्हणाले.

या वेळी आमदार प्रा. देवयानी फरांदे, नाशिक लोकसभा समन्वयक गिरीश पालवे, नाशिक ग्रामीण अध्यक्ष शंकर वाघ, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, माजी महापौर सतीश कुलकर्णी, ज्येष्ठ नेते विजय साने, प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार, प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, महानगर माध्यम विभाग प्रभारी पवन भगूरकर, सुनील केदार, जगन पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Kannad Nagarparishad Election : कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचा युतीचा फॉर्म्युला ठरला; जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची माहिती

Dharur Nagarparishad Election : धारूर नगरपरिषदेत चौरंगी लढत रंगणार! अध्यक्षपदासाठी १६, तर नगरसेवक पदासाठी तब्बल १५१ नामनिर्देशन पत्र दाखल

Latest Marathi Breaking News: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Drone Delivery Service: दूध, किराणा, पॅकेजेस… सगळं थेट ड्रोनने घरी पोहोचणार! मुंबईत पहिली निवासी ड्रोन डिलिव्हरी सेवा सुरू होणार, पण कधी?

SCROLL FOR NEXT