BJPs agitation in Mumbai SYSTEM
नाशिक

नाशिकमध्ये रेमडेसिव्हिर, ऑक्सिजनसाठी भाजप पदाधिकाऱ्यांचा मुंबईत ठिय्या

बेड मिळतं नाही. बेड मिळाले तर ऑक्सिजन नाही. ऑक्सिजन बेड मिळाला तर रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळतं नसल्याने संपुर्ण शहरचं व्हेन्टीलेटरवर आले आहे

विक्रांत मते

नाशिक : पंधरा दिवसांपासून ऑक्सिजनचा तुटवडा व रेमडेसिव्हिर इंजेक्शनची कमतरता शहर व जिल्ह्यात जाणवतं असताना देखील नाशिककडे दुर्लक्ष होत असल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता.२९) मुंबईतील अन्न व औषध प्रशासन कार्यालयात धडक देत तीन तास ठिय्या आंदोलन केले.

आंदोलनाचा जोर वाढताच व्हिडीओकॉन्फरन्सिंग

आंदोलनाचा ज्वर चढत असल्याने अखेरीस एफडीएच्या प्रमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून परिस्थितीत सुधारणा करण्याच्या सुचना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मार्च महिन्यापासून शहर व जिल्ह्यात कोरोना संसर्गाने बेहाल करून सोडले आहे. प्रारंभी बेड मिळतं नव्हते. बेड मिळाले तर ऑक्सिजन नाही. ऑक्सिजन बेड मिळाला तर रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळतं नसल्याने संपुर्ण शहरचं व्हेन्टिलेटरवर आले आहे, अशी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर माजी पालकमंत्री गिरीष महाजन यांनी बुधवारी नाशिक शहर दौरा करून परिस्थिती जाणून घेतल्यानंतर त्यांच्याकडे प्राप्त तक्रारीच्या अनुशंगाने गुरुवारी (ता. २९) बीकेसी मधील अन्न व औषध प्रशासन आयुक्तांच्या कार्यालयावर भाजपच्या पदाधिकार्यांनी धडक दिली.

वास्तविकता आणली निदर्शनास

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, नाशिकचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली महापौर सतीश कुलकर्णी, खासदार डॉ भारती पवार, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, शहराध्यक्ष गिरीश पालवे, स्थायी समिती सभापती गणेश गिते, महापालिकेचे सभागृह नेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, भाजप संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव आदींनी एफडीएचे सचिव विजय सौरभ यांच्याशी चर्चा केली. नाशिक जिल्हा कोरोनाच्या विळख्यात सापडला असून घातक परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध होत नाही सरासरी ४०० ते ५०० रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा होत आहे. वास्तविक राज्यात पुणे व ठाणेपेक्षा अधिक रुग्ण आढळतं असल्याने रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा अधिक पुरवठा होणे अपेक्षित आहे. मात्र तो होत नसल्याची बाब निदर्शनास आणून दिली. नाशिक जिल्ह्यासाठी १२५ टन ऑक्सीजनची गरज असतांना फक्त सरासरी ७० टन ऑक्सिजन मिळतो, त्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढल्याचे सांगण्यात आले. बघू, करू असे सरकारी छाप उत्तर मिळतं असल्याने ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला.

आंदोलनाचे फलित

आंदोलन सुरु असतानाचं एफडीएचे आयुक्त परिमल सिंग, उपायुक्त विजय वाघमारे यांनी तातडीने जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. बैठकीत नाशिक मधील रुग्णांसाठी वाढीव रेमडेसिव्हिर व ऑक्सीजन उपलब्ध करून घेण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. नाशिकसाठी १०० टन ऑक्सीजन व सुमारे २ हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT