remdesivir injection esakal
नाशिक

‘रेमडेसिव्हिर’चा काळा बाजार : तपासात आणखी काही संशयितांची नावे पुढे

योगेश मोरे

म्हसरूळ (जि.नाशिक) : रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा (remdesivir injection) काळा बाजार करणाऱ्या तीन तरुणी व एका तरुणाला आडगाव पोलिसांनी (aadgaon police) अटक केल्यानंतर या गुन्ह्यात आणखी चौघा संशयितांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले. (black market for remedivir)

आजवरची ही सर्वांत मोठी कारवाई

रेमडेसिव्हिर इंजेक्शन काळा बाजार प्रकरणातील आजवरची ही सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे. आडगाव पोलिसांनी अटक केलेल्या चौघांच्या अधिक चौकशीनंतर आणखी एक तरुणी व एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून दुचाकी, मोबाईलसह दोन रेमडेसिव्हिर इंजेक्शनही जप्त करण्यात आली होती. त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. यादरम्यान चौकशीत आणखी चार संशयितांची नावे पुढे आली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी नाशिकमधून एका संशयिताला ताब्यात घेतले. त्यानंतर सोमवारी (ता. १७) आणखी तिघांच्या टोळीस विरार व वाडा येथून ताब्यात घेतले. या संशयितांकडून काळ्या बाजारात विक्रीस असलेले एकूण ६१ हजार रुपये किमतीची २० रेमडेसिव्हिर इंजेक्शन जप्त केली आहेत. संशयितांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना बुधवार (ता. १९)पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

तब्बल २० इंजेक्शन जप्त

यावरून पोलिसांनी पालघर जिल्ह्यातील विरार आणि वाडा येथून तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तब्बल २० इंजेक्शन जप्त केली आहेत. तत्पूर्वी, रविवारी (ता. १६) नाशिकमधून आणखी एका संशयिताला ताब्यात घेतले. त्यामुळे आता संशयितांची संख्या आठवर गेली आहे.वरिष्ठ पोलिस निरीक्षक इरफान शेख यांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र कपले, हवालदार सुरेश नरवडे, भास्कर वाढवणे, विजयकुमार सूर्यवंशी, दशरथ पागी, सचिन बाहीकर, वैभव परदेशी, विश्‍वास साबळे, देवानंद मोरे यांनी ही कामगिरी केली. पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र कपले तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

स्टार प्रवाहवरील अभिनेत्रीची झी मराठीच्या 'सनई चौघडे' मध्ये एंट्री; पहिल्यांदा साकारणार आईची भूमिका

Pre Sleep Habits: दिवसभराचा थकवा आणि चिडचिड घालवायची असेल, तर झोपण्यापूर्वी 'या' गोष्टींना करा कायमचा टाटा!

Latest Marathi News Live Update: ५०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकेचा करमाफीचा प्रस्ताव फेटाळला

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

SCROLL FOR NEXT