nashik esakal
नाशिक

Nashik : लखमापुरात मेगाफाईन कंपनीत स्फोट, 1 कामगार ठार तर 4 जखमी

दिगंबर पाटोळे : सकाळ वृत्तसेवा

वणी (नाशिक) : लखमापूर, (ता. दिंडोरी) शिवारातील मेगाफाईन कंपनीतील रिअॅक्टर मशिनला अचानक आग लागून झालेल्या स्फोटात 1 कामगार ठार तर 4 जखमी झाल्याची घटना घडली आहे. (blast in company lakhmapur nashik)

वणीत मेगाफाईन कंपनीत स्फोट, 1 ठार तर 4 जखमी

लखमापूर मेगाफाईन कंपनीत जे विभागातील रिअॅक्टर मशिनला (ता.२१) रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागून स्फोट झाला. या ठिकाणी काम करणारे कामगार संदिप वसंत गायकवाड (रा. मडकीजांब ता. दिंडोरी) हे स्फोटात गंभीररित्या भाजले असल्याने मृत्यू झाला. तर केशव सुनीराम धुळे, (रा. ननाशी ता. दिंडोरी), बाजीराव निवृत्ती चव्हाण (रा. अंजनेरी ता. त्रंबकेश्वर), रविंद्र गोपाळ (गो-हाळे रा. दोनवडे), कमलेश रमेश गवळी, (रा. मडकीजांब) हे गंभीर जखमी झाले. जखमींना नाशिक येथे रुग्णायात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

पोलीसांचा अधिक तपास

याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पी. आर. शेलार, पोउनि रतन पगार अधिक तपास करीत असून प्रमोद बाळकृष्ण बच्छाव (वय 49), प्रॉडक्शन अधिकारी, मेगाफाईन कंपनी, लखमापुर फाटा, (ता. दिंडोरी) यांच्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर घटनेस जबाबदार असलेल्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT