Road widening work is in progress along with road blockers at the accident site esakal
नाशिक

Bus Fire Accident: अपघातस्थळी सिग्नलच्या चारही बाजूने गतिरोधक अन् रस्ता रुंदीकरण

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : औरंगाबाद महामार्गावरील हॉटेल मिरची चौकात चारही बाजूने फॅनिंग करण्यासाठी येथील अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावण्याबरोबरच आज सिग्नलच्या चारही बाजूने गतिरोधक टाकण्यात आले.

औरंगाबाद महामार्गावरील हॉटेल मिरची चौकात ८ ऑक्टोबरला खासगी ट्रॅव्हल बसला भीषण अपघात झाला. या अपघातात बसला लागलेल्या आगीत १२ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर ४८ गंभीर जखमी झाले. घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, महामार्ग प्राधिकरण व राज्य परिवहन विभागाकडून झालेल्या त्रुटींवर लक्ष केंद्रित करण्यात आले त्यानुसार महापालिकेने या भागातील अतिक्रमण काढण्यासाठी पावले उचलले असून मिरची चौक सिग्नल भागात १५ मीटरचे फॅनिंग करण्यासाठी अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावल्या आहेत. (Blockade road widening on all sides of signal at site of Bus Fire Accident Nashik Latest Marathi News)

सिग्नल चौक भागात गतिरोधक व रम्बलर स्ट्रीप बसविण्यात आले. तपोवनच्या बाजूने सिग्नलच्या डाव्या बाजूच्या रस्त्याच्या फनिंगचे काम सुरू करण्यात आले आहे. उर्वरित तीन बाजूंच्या फॅनिंगची कामे करण्यासाठी अनधिकृत व अतिक्रमित बांधकामे व शेड काढण्यासाठी नगर नियोजन व अतिक्रमण विभागामार्फत नोटिसा बजावण्यात आल्या. अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढल्यास कारवाई केली जाणार आहे. महामार्गावर वाहनांचा वेग मर्यादित करण्यासाठी अपघात प्रमाण क्षेत्र व गतिरोधकाचा फलक लावण्यात आला.

महापालिका करणार रस्ता रुंदीकरण

या भागातील रस्त्याचे महापालिकेकडून रुंदीकरण केले जाणार आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावर दुभाजकाची निर्मितीदेखील केली जाईल. महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या भागात डीपी बसवण्यासंदर्भात पाहणी केली. नांदूर नाक्यावरून येणाऱ्या महामार्गाच्या बाजूला सिग्नल जवळचे विद्युत रोहित्र हटवण्यासाठी अधिकाऱ्यांनी अनुकूलता दर्शविली आहे. तसेच अतिउच्च दाबाच्या वीज वाहिन्या भूमिगत करण्याचाही निर्णय घेण्यात आला. दरम्यान, मिरची चौक सिग्नलच्या धर्तीवर नांदूर नाका व सिद्धिविनायक लॉन्स येथेही सुधारणा केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT