running BMW car caught fire at Mohdari Ghat on the Nashik-Pune highway. esakal
नाशिक

नाशिक पुणे महामार्गावर बर्निंग कारचा थरार; मोहदरी घाटात BMW कार पेटली

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर येथील मोहदरी घाटात धावती बीएमडब्ल्यू कार रविवारी (ता. १८) रात्री अकराच्या सुमारास पेटली. (BMW car caught fire in Mohadari Ghat Nashik, Latest Marathi News)

या घटनेत जीवितहानी झाली नसल्याचे समजते. कार (जीजे ०४, बीई ९८८२) जळून खाक झाली. सिन्नर पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सिन्नर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या बंबाने आग विझविली. मात्र तोपर्यंत सुमारे तासभर पुणे महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

कारचालक अमिन आली सय्यद यांनी स्वतःचे प्राण वाचविले. ते पुण्याहून सुरतच्या दिशेने जात होते. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान नवनाथ जोंधळे, लाला वाल्मीकी, लक्ष्मण सोनकुसरे, मंगेश कटारनवरे, जयेश बोरसे आदींनी प्रयत्न केले. सिन्नर पोलिसांनीही मदतकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT