bodies of woman and her baby were lying there for 12 hours as hearse van could not be afforded Nashik
नाशिक

मृत्युनंतरही परवड थांबेना! पैशाअभावी माय-लेकराचे मृतदेह १२ तास पडून

विनोद बेदरकर

नाशिक : केवळ पैसे नसल्याने दुर्गम भागातील गरीब रुग्णांचे मृतदेह पडून राहत असल्याचे प्रकार वाढत आहे. आज पहाटे मध्यरात्री एकला दाखल झालेल्या अशाच एका अभागी महिला आणि तिच्या बाळाचा मृतदेह सरकारी शववाहिका मिळाली नाही म्हणून तब्बल बारा तासाहून आधीक काळ तसाच पडून राहिला. बारा तासानंतर एका आमदारांच्या प्रयत्नाने रुग्णवाहिका मिळाली. त्यानंतर १५ तासानंतर मृतदेह घरी पोहोचला.

रेखा पोटींदे (वय ३५, कायरी पो. दाभेरी दा.जव्हार) असे दुदैवी मृत मातेचे नाव आहे. शनिवारी (ता.२३) तिला प्रसूत वेदना होउ लागल्याने जव्हार रुग्णालयात दाखल केले होतो. तेथून काल मध्यरात्री उशीरा नाशिकला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. नाशिकचे जिल्हा सामान्य रुग्णालय जिल्ह्यातील पंधरा तालुक्याशिवाय ठाणे जिल्ह्यातील जव्हार मोखाडा भागातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यासाठी आधार आहे. जव्हार मोखाडा भागातील अनेक गरीब रुग्ण उपचाराला नाशिकला येतात. किंवा तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून त्यांना नाशिकला सिव्हील रुग्णालयात पाठविले जाते. काल शनिवारी (ता.२३) रेखा पोटींदे या गरीब महिला तेथील जव्हार रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली होती. मात्र तिची प्रकृती किचकट असल्याने तेथील रुग्णालयाने नाशिकला सामान्य रुग्णालयात शिफारस केली. त्यानुसार मध्यरात्री उशीरा महिला नाशिकला जिल्हा रुग्णालयात दाखल झाली.

... शववाहिका मिळालीच नाही

नाशिकला उपचारा दरम्यान तिला येथील वैद्यकिय आधिकाऱ्यांनी मृत घोषीत केले. महिला व तिच्या बाळाचा मृतदेह पून्हा अंत्याविधीला जव्हारला नेण्यासाठी तिचे कुटुंबीय सरकारी शववाहिकेची वाट पहात राहिले. साधारण लहान बाळाचा मृत्यु झाला तर, लागलीच नाशिकला अनेक कुटुंब अंत्यसंस्कार उरकतात व मातेला मिळेल त्या खासगी वाहानाने गावाकडे घेउन जातात. पण या दुर्गटनेत माता आणि तिचे बाळ असे दोन्ही मृतदेह असल्याने गावाकडे जाण्यासाठी त्यांना शववाहिका उपलब्ध झाली नाही. तब्बल दहा तासाच्या प्रतिक्षेनंतर काही सामाजिक कार्यकर्त्यानी जिल्हा रुग्णालयाच्या यंत्रणेशी संर्पक साधला सरकारी शववाहिका मिळेल या आशेवर तसाच पडून राहिलेल्या मृतदेहांना शववाहिका अखेरपर्यत मिळालीच नाही. आमदार विवेक पंडीत यांनी खटपट केल्यानंतर एका रुग्णवाहिकेतून ही दोन्ही शव दुपारी एकच्या सुमारास जव्हारला रवाना झाले.

आर्थिक विवंचना हेच कारण

जव्हार मोखाडा भागातील आदिवासी कुटुंबांना नाशिकला रुग्णालयात आणण्यापासून रोजच रुग्णवाहिका व शववाहिकांची प्रतिक्षा करावी लागते. शासनाने जिल्हा रुग्णालयाला तीसेक नवीन रुग्णवाहिका दिल्या आहेत. पण शववाहिका मात्र नाहीत. त्यामुळे दुर्गम भागातील रुग्णांना उपचारानंतर गावाला जाण्यासाठी एका रुग्णासाठी रुग्णवाहिकाही जात नाही. त्या भागात दोन तीन रुग्ण असल्यास येथून रुग्णवाहिका पाठविल्या जातात.

पण शववाहिकाच नसल्याने मृतदेह स्वखर्चानेच न्यावे लागतात. खासगी शववाहिकेसाठी ४ ते ५ हजारावर खर्च येतो. एवढे पैसे या गरीब कुटुंबाकडे नसतात. त्यामुळे पैशाची सोय होईपर्यत किंवा कुणी तरी दाता मिळेल या आशेवर अशा गरीब कुटुंबाना शववाहिकां मिळेपर्यंत मृतदेह तसेच ठेउन प्रतिक्षा करण्याशिवाय काहीच पर्याय नसतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT