well  
नाशिक

पडक्या विहिरीत पुरुषाचा मृतदेह; गळा आवळून खून केल्याचा संशय

राजेंद्र बच्छाव

इंदिरानगर (नाशिक) : वडाळा येथील अण्णाभाऊ साठे नगर लगत असलेल्या पडक्या विहिरीत ३५ ते ४० वयाचा अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. प्रथम दर्शनी त्याचा गळा आवळून खून केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. (body of an unidentified man was found in a well at Wadala)

शनिवारी (ता.२४) सकाळी साडेदहाच्या सुमारास हिरामण साळवे आपल्या शेतात गेले असता त्यांना दुर्गंधी आली. त्यांनी विहिरीत बघितले असता पुरुष जातीचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आला. त्यांनी इंदिरानगर पोलिसांना माहिती दिली. सिडको अग्निशमन दलाचे जवान व इंदिरानगर पोलिस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोर व स्ट्रेचरच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. मृतदेह विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. दरम्यान प्रथमदर्शनी या इसमाचा गळा आवळून खून केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवीत त्याच्या डाव्या हातावरती मारुती व शंकराची पिंड गोंदल्याची माहिती दिली. पुरुषाबाबत काही माहिती असल्यास इंदिरानगर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईणकर यांनी केले आहे. दरम्यान, इंदिरानगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर महाराष्ट्रात होणार! रोजगार नव्याने फुलणार; फडणवीसांनी 'ती' जागाच सांगितली

SALIL ARORA : २० चेंडूंत १०२ धावा! पंजाबमधून आणखी एक युवा सुपरस्टार आला; २३ वर्षाच्या पोराने SMAT मध्ये धुमाकूळ घातला...

Pune Traffic News : धायरी फाट्यावर वाहतूक कोंडी गंभीर; रस्त्याची पुनर्रचना व अतिक्रमण हटवण्याची मागणी

ED Action: दहशतवादी कृत्यांना आर्थिक पुरवठा अन्..., बदलापूर गावात ईडीचा छापा; नेमकं काय घडलं?

Bank UPI Service: खातेधारकांनो लक्ष द्या! डिसेंबर महिन्यात UPI सेवा पूर्णपणे बंद राहणार; कोणत्या बँकेची अन् कधी? वाचा...

SCROLL FOR NEXT