Sushil Patil esakal
नाशिक

Nashik Crime News : पावणेतीन कोटींचा गंडा घालणारा ‘बोलबच्चन’ सुशील जेरबंद! 5 दिवसांची कोठडी

बोलबच्चन असलेल्या पाटील याने अनेकांना आमिष दाखूवन गंडा घातला असण्याची शक्यता असून, त्याच्याविरोधात आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : देवळाली कॅम्प परिसरातील लॅम रोड येथील उच्चशिक्षित महिलेसह नातलगांना शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून भामट्याने तब्बल दोन कोटी ७६ लाखांना गंडा घातला आहे.

या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांत संशयित भामटा सुशील भालचंद्र पाटील (३५, रा. लोचन अपार्टमेंट, मधुबन कॉलनी, मखमलाबाद नाका, पंचवटी) यास अटक केली असून, न्यायालयाने त्यास सोमवारपर्यंत (ता. १०) पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, संशयित पाटील यास महिनाभरापूर्वीच चाळीसगाव येथील दीड कोटीच्या फसवणूकप्रकरणी अटक झाली होती. बोलबच्चन असलेल्या पाटील याने अनेकांना आमिष दाखूवन गंडा घातला असण्याची शक्यता असून, त्याच्याविरोधात आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. (Bolbachan Sushil fraud of fifty three crores jailed 5 days custody Nashik Crime News)

अनिला अशोक आव्हाड (रा. लॅम रोड, देवळाली कॅम्प) यांच्या फिर्यादीनुसार, जानेवारी २०१८ मध्ये संशयित सुशील पाटील याच्याशी अनिला यांची ओळख झाली. त्या वेळी संशयिताने इंजिनिअरिंगचे शिक्षण झालेल्या अनिला यांना शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले.

तसेच त्यांची बहीणही उच्चशिक्षित असल्याने त्यांनाही चांगली शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. यासाठी संशयित पाटील याने मंत्रालयापासून ते शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत ओळख असल्याचे भासवून आणि पैसे दिल्याशिवाय चांगली शासकीय नोकरी मिळत नसल्याचे सांगत त्याने अनिला यांचा विश्‍वास संपादन केला.

त्यामुळे नातेवाइकांकडून हातउसनवार पैसे घेत अनिला यांनी २०१९ ते २०२० दरम्यान ६१ लाखांच्या रोकडसह एकूण दोन कोटी १५ लाख रुपये संशयित पाटीलसह त्याने सांगितलेल्या बँक खात्यांवर वर्ग केले. संशयिताने असे एकूण दोन कोटी ७६ लाख रुपये घेतल्यानंतरही त्याच्याकडून नोकरीचे काम होत नसल्याने त्यास सातत्याने संपर्क साधून विचारणा केली.

२०२० मध्ये त्याने अनिला व त्यांची बहिण अश्‍विनी सांगळे व त्यांचे वडील अशोक आव्हाड यांना भेटायला बोलावले. उपनगर येथील फेम टॉकिजजवळ भेट झाली असता, त्या वेळी त्याने काही शासकीय अधिकाऱ्यांची ओळख करून देत त्यांच्या बहिणीचे काम फूडस्‌ ॲन्ड ड्रग्जस्‌ विभागात निरीक्षक म्हणून झाल्याचे नियुक्तीपत्र दाखविले. ते पत्र त्यांच्या मूळ पत्त्यावर जाईल, असेही सांगितले.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

प्रत्यक्षात तसे काहीच न झाल्याने याबाबत वारंवार विचारणा केल्यानंतर संशयित पाटील याने टाळाटाळ सुरू केली. जानेवारी २०२३ मध्ये त्याच्या घरी जाऊन जाब विचारला असता त्याने काय करायचे ते करा, असे म्हणत त्यांची फसवणूक केली.

या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांत संशयित पाटील याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला असून, पाटील यास अटक झाली असून, न्यायालयाने सोमवारपर्यंत (ता.१०) पोलिस कोठडी सुनावली आहे.

चाळीसगावात दीड कोटीची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगावातील (जि. जळगाव) बँक ऑफ महाराष्ट्राची संशयित पाटील याने बनावट कागदपत्रांच्या आधारे एक कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केली होती.

त्यास गेल्याच महिन्यात नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून चाळीसगाव पोलिसांच्या ताब्यात दिले होते. संशयित पाटील बोलण्यात तरबेज असून, आर्थिक गुंतवणुकीतही त्याने अनेकांना गंडा घातला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत त्याच्याविरोधात आणखी तक्रारी दाखल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.

"संशयित सुशील पाटील याने नोकरीचे आमिष दाखवून वा मोठ्या आर्थिक गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून कोणाची फसवणूक केली असेल, तर त्यांनी तत्काळ नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करावी. कोणीही अशा आमिषांना भुलून न जाता पैसे देऊ नये."

- प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, नाशिक शहर गुन्हे शाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT