sound system sakal
नाशिक

Navratri Festival 2023 : नाशिकच्या ऑर्केस्ट्रा कलाकारांना सुगीचे दिवस! नवरात्रोत्सवात बुकिंग फुल्ल

सकाळ वृत्तसेवा

Navratri Festival 2023 : उदे ग अंबे उदे, अंबे कृपा करी, जय अंबे गौरी, ढोलिढा ढोल या सारख्या गाण्यांनी ऑर्केस्ट्रा कलाकार नवरात्रातील नऊ दिवसांत नाशिककरांना दांडिया, गरब्यावर ठेका धरायला लावणार आहे.

नवरात्रोत्सवातील नऊ दिवसांचे ऑर्केस्ट्रा कलाकारांचे बुकिंग फुल्ल झाले आहे. कलाकारांना नवरात्रोत्सवात अच्छे दिन येणार असून दसरा व दिवाळी गोड जाणार आहे. (booking of Navratri festival orchestra artists is full nashik news)

नवरात्रोत्सवाला रविवारी (ता. १५) घटस्थापनेपासून सुरवात होत आहे. नाशिक जिल्ह्यात जवळपास पाचशेहून अधिक ऑर्केस्ट्रा कलाकार आहेत. सर्वच कलाकार ग्रुपचे बुकिंग झाले आहे. गत वर्षाच्या तुलनेत कलाकारांची सर्वाधिक झाली आहे, त्या आधी कोरोना असल्याने कलाकारांचे मोठे नुकसान झाले होते.

यंदा कलाकारांची पूर्ण नऊ दिवस कार्यक्रमांची लगबग असणार आहे. गणेशोत्सवात चांगल्या प्रतिसादानंतर नवरात्रात कलाकारांचे बुकिंग फुल्ल झाल्याने या संबंधित साउंड, लाईट्‍स व्यावसायिकांनाही काम मिळाले आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवात मोठी उलाढाल होणार आहे.

नवरात्रोत्सवात नाशिक जिल्ह्यासह ऑर्केस्ट्रा कलाकारांना जळगाव, धुळे, पाचोरा, शिरपूर आदी ठिकाणाहून विचारणा झाली आहे.

गणेशोत्सवा पाठोपाठ नवरात्रात कलाकारांना काम मिळत असल्याने कलाकारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

"ऑर्केस्ट्रा असोसिएशनचे जिल्ह्यात ५५० हून अधिक सभासद आहे. सर्वच गायक, वादक तसेच, साउंड, लाईट्‍स व्यावसायिक बुक आहे. कलाकारांची नवरात्री चांगली गेल्यास दसरा दिवाळी गोड जाते. नवरात्रोत्सवात कलाकारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे." - उमेश गायकवाड, अध्यक्ष नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशन

"नवरात्रोत्सवात कलाकारांना अच्छे दिन आले आहे. कलाकारांना नाशिक जिल्ह्यासह जळगाव, धुळे जिल्ह्यातून विचारणा होत आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्रातील नऊ दिवस कलाकारांचे बुकिंग फुल्ल आहे." - प्रशांत महाले, किबोर्ड वादक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT