4BALBHARTI.jpg 
नाशिक

एकीकडे "बालभारती''ची अनेक पुस्तके गुदामात पडून...अन् विद्यार्थी मात्र पुस्तकाच्या प्रतीक्षेत!

प्रमोद दंडगव्हाळ : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : (सिडको) "बालभारती'कडून सर्वशिक्षा अभियानांतर्गत मोफत पुस्तकांव्यतिरिक्त व्यापारी वर्गाला पहिली ते आठवीपर्यंतची इंग्रजी माध्यम तसेच नववी ते बारावीची इंग्रजी व मराठी माध्यमाची पुस्तके खुल्या विक्रीसाठी दिली जातात. मागील वर्षी 20 लाख रुपये किमतीच्या पुस्तकांची खुली विक्री करण्यात आली होती. या वर्षी अवघ्या साडेसात लाखांपर्यंत पुस्तक विक्री झाली आहे. याचाच अर्थ 35 टक्केच विक्री झाली असून, 65 टक्के पुस्तक विक्री होणे बाकी आहे. 

"बालभारती'लाही चांगलाच फटका

लॉकडाउन व शाळांची सद्यःस्थिती पाहता विक्रेत्यांनी पुस्तक खरेदीत या वर्षी आखता हात घेतला असल्याचे दिसून आले आहे. सर्वशिक्षा अभियानांतर्गत 95 टक्के पुस्तके वाटप करण्यात आली आहेत. त्यात 94 लाख 20 हजार 166 पुस्तकांची मागणी होती. त्यांपैकी 80 लाख 42 हजार 24 पुस्तकांचे वाटप करण्यात आले. पाच लाख 65 हजार 905 पुस्तकांचे वाटप बाकी आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्रातर्फे व्यापारी वर्गाला वाटप करण्यात येणाऱ्या खुल्या विक्रीतील पुस्तकांमध्ये थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 65 टक्‍क्‍यांपेक्षाही अधिकने घट झाली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर "बालभारती'लाही चांगलाच फटका बसला असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

नऊ तालुक्‍यांतील विद्यार्थी पुस्तकांच्या प्रतीक्षेत 

बालभारतीकडे आजअखेर "एकात्मिक' पुस्तके येणे बाकी आहे. यामध्ये पहिली ते नववीपर्यंतच्या एकूण पाच लाख 65 हजार 905 पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. ही पुस्तके महापालिका हद्दीतील नाशिक, मालेगाव, जळगाव व धुळे तसेच निफाड, शिंदखेडा, नवापूर, चोपडा या तालुक्‍यांत वाटप केली जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; लागोपाठ स्फोट अन्...

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ; नेमक्या कशा धावणार गाड्या..

SCROLL FOR NEXT