daru 1234.jpg 
नाशिक

आरारा...पिण्याची तलप काय सोसवे ना भाऊ.!.लॉकडाऊनमध्ये होताएत असले धंदे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / इगतपुरी  : आजवर तळीरामांनी दारूच्या दुकानांमध्ये लूट केल्याच्या घटना आपण ऐकल्या असतील; परंतु इगतपुरीत चक्क सील केलेल्या वाइन शॉपीतून मध्यरात्रीच्या सुमारास व्यवस्थापकानेच सील तोडून बिअरच्या बाटल्या पळविल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी बिअर शॉपीच्या व्यवस्थापकासह दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गाडीसह सुमारे तीन लाख 47 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. 

असा घडला प्रकार

राज्य उत्पादन शुल्क विभागाने महिन्यापूर्वीच सर्वच बिअर बार व वाइन शॉप दुकानांना सील केले आहे. असे असताना इगतपुरी शहरातील सिटी कॉर्नर बिअर ऍन्ड वाइन शॉपीचे सीलबंद कुलूप काढून बिअर बाटल्यांची विक्री सुरू असल्याची खबर जिल्हा उत्पादन शुल्क विभागाला मिळाल्याने त्यांनी पुन्हा संबंधित मालकाला समज देत बिअर शॉपी सील केली होती. मात्र दोन दिवसींपूर्वी पुन्हा सिटी बिअर ऍन्ड वाइन शॉपीचे सील तोडून पहाटे साडेचारच्या सुमारास बिअर शॉपीचे व्यवस्थापक विनोद किसन बोंडे (रा. घोटी) व त्याचे सहकारी संतोष विजय गिरी, शुभम सुनील उत्तेकर (दोघे रा. सह्याद्रीनगर, इगतपुरी) यांनी त्यांच्या ताब्यातील वाहनातून (एमएच 02, बीवाय 5527) विविध कंपन्यांच्या 47 हजार 232 रुपये किमतीचे बिअरचे बॉक्‍स विक्रीसाठी नाशिकला घेऊन जात होता. याची माहिती इगतपुरी पोलिस ठाण्यात समजताच हवालदार विनोद गोसावी, गणेश वराडे, सचिन देसले, वैभव वाणी आदींनी मुंबई-आग्रा महामार्गावर सापळा रचत वाहन व तिघा संशयितांना ताब्यात घेतले.

चक्क व्यवस्थापकानेच पळविल्या बिअरच्या बाटल्या ​

या गुन्ह्याची फिर्याद पोलिस नाईक वैभव वाणी यांनी इगतपुरी पोलिस ठाण्यात दिली असून, पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाचे पोलिस कर्मचारी गणेश वराडे, विनोद गोसावी, सचिन देसले, मुकेश महिरे, वैभव वाणी, जयहरी गांगुर्डे, दत्तात्रय आहेर तपास करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT