leopard esakal
नाशिक

Nashik : बिबट्याच्या हल्ल्यात मुलगा जखमी

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि, नाशिक) : सातपूर लोकवस्ती असलेल्या भागात बिबट्या (Leopard) आढळून आल्याची घटना ताजी असताना म्हसरूळ- आडगाव लिंकरोडवरील जाधव - देशमुख वस्तीवर पाच वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला (Attack) केल्याची घटना मंगळवार (ता. ५) रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Boy injured in leopard attack Nashik news)

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, म्हसरूळ -आडगाव लिंकरोडवर शेतमळ्यांची वस्ती आहे. याच लिंक रोडवर जाधव - देशमुख व कडाळे वस्ती आहे. येथे आडगाव येथील दीपक त्रंबक देशमुख (वय ४०) यांची शेती आहे आणि येथेच त्याच्या कुटुंबासह ते वास्तव्य करतात. मंगळवार (ता.५) रोजी रात्री साडे आठ ते नऊ वाजेच्या सुमारास दीपक देशमुख यांच्या पत्नी या घराच्या ओट्यावर भांडी घासत होत्या. त्यांचा पाच वर्षीय मुलगा साई हा खेळत होता. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानकपणे साई वर हल्ला चढविला .त्यास समोर असलेल्या मक्याच्या शेतात ओढून नेले. यावेळी दीपक देशमुख यांची पत्नी व घरातील इतर लोकांनी आरडाओरडा केला. त्यामुळे काहीजण बिबटया गेला तिकडे धावत गेले. तेव्हा बिबट्याने मुलगा साई यास सोडून धूम ठोकली, यात साई हा गंभीर जखमी झाला असून त्यावर खाली उपचार सुरू आहे सदर घटनेची माहिती वनविभागाला कळतात त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व पाहणी केली.

तसेच जखमी साई यास रुग्णालयात जाऊन चौकशी देखील केली. जाधव-देशमुख-कडाळे वस्ती वरील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.त्यानुसार वन विभाग त्या भागात पिंजरा बसविणार आहेत.तसेच वन विभगाचे अधिकारी भदाणे यांनी शेत वस्तीवरील रहिवाश्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Municipality: एससी-एसटींसाठी नवे प्रभाग! महापालिकेसाठी फेररचना; जुन्या राखीव वॉर्डांमध्ये बदल

'हे असला फालतूपणा' जान्हवी जयंतपासून स्वत:ची सुटका करुन घेणार, लक्ष्मी निवासचा प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले...'संपवण्यापेक्षा...'

Latest Marathi News Live Update: कृषी उत्पन्न बाजार समितीममध्ये लसणाची आवक घटल्याने दरामध्ये वाढ होण्यास सुरुवात

ICC Womens World Cup : ३३० धावा करूनही हरल्या, स्पर्धेबाहेर जाण्याचे संकट... कर्णधार हरमनप्रीत कौरने कोणावर फोडले खापर?

Sangli News: कवलापूरला विमानतळ करा; मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पृथ्वीराज पाटील यांच्याकडून साकडे

SCROLL FOR NEXT