Sports News
Sports News esakal
नाशिक

Nashik Sports Update : हिवाळी क्रीडा स्पर्धांवर बहिष्काराची टांगती तलवार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोनाच्या प्रतिबंधामुळे दोन वर्ष क्रीडा स्पर्धा होवू शकल्या नाहीत. यंदा तिसऱ्या वर्षी शुल्क वाढीच्या विरोधात क्रीडा शिक्षक संघटनेचे बहिष्काराचा इशारा दिल्याने तिसऱ्या एकट्या जिल्ह्यातील साडेनऊ हजाराहून अधिक विद्यार्थ्याचा सहभाग असलेल्या हिवाळी क्रीडा स्पर्धांवर टांगती तलवार आहे.

राज्यात कोरोना महामारीमुळे २०२०-२१ आणि २०२१-२२ अशा दोन आर्थिक वर्षात क्रीडा स्पर्धा होवू शकल्या नाही. यंदा क्रीडा स्पर्धाचे व्यापक नियोजन झाले आहे. मात्र अशाही स्थितीत राज्यस्तरापर्यंतच्या क्रीडा स्पर्धा होणार आहेत. क्रीडा विभागातर्फे हिवाळी क्रीडा स्पर्धांची व्यापक तयारी करण्यात आली आहे. (Boycott of winter sports Two years of Corona slowness, this year there is an obstacle to increase in fees Nashik Sports News)

११७२ शाळा ९५०० विद्यार्थी

मागील ५ ऑक्टोबर २०२२ पासून ३१ ऑक्टोबर या एका महिन्यात ११७२ शाळांनी प्राथमिक नोंदणी केली असून ९५०० च्या वर विद्यार्थ्याची शुल्क भरून नोंदणी झाली आहे. दिवाळी सुटी नंतर शाळा आता सुरू होत असून संघटनेच्या मागणीनुसार बुधवारी (ता.९) पर्यंत नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

मराठी शाळांना दहा-बारा वर्षापासून अनुदान नाही आणि क्रीडा कार्यालय ग्रामीण आणि आदिवासी विद्यार्थ्यांकडून नोंदणी फी च्या रूपात वाढीव जिझिया कर वसूल करत आहे. शुल्काच्या माध्यमातून त्यांनी कोट्यवधी रुपये जमा केले. त्याऐवजी मुदत ठेवी केल्या असून त्याच्या व्याजाचा विनियोग व्हायला हवा अशी क्रीडा संघटना प्रतिनिधीचा म्हणणे आहे. याच भूमिकेतून शुल्क वाढीला विरोध करीत क्रीडा संघटनांनी स्पर्धेवर बहिष्काराचा इशारा दिला आहे.

स्पर्धेसाठी क्रीडा विभागाने व्यापक नियोजन केले आहे. प्रत्येक क्रीडा प्रकारासाठी अधिकारी कर्मचारी नियुक्त केले आहेत. साधारण ८४ स्पर्धासाठी क्रीडांगणासह वेळा निश्चित केल्या आहेत. प्रत्येक तालुक्यासह महापालिका क्षेत्रासाठी स्पर्धा आणि नियोजनाचे कामकाज पूर्णत्वास आले असताना क्रीडा शुल्काचा मुद्दा उपस्थित करीत बहिष्काराचा इशारा दिला आहे. त्यामुळे स्पर्धांवर बहिष्काराचे सावटामुळे टांगती तलवार आहे.

शालेय क्रीडा स्पर्धेसाठी वयोगट

११ वर्षांतील (सहावी पर्यत) एक जानेवारी २०१२ नंतर जन्मलेले

१४ वर्षांतील (दहावी पर्यत) एक जानेवारी २००९ नंतर जन्मलेले

१७ वर्षांतील (बारावी पर्यत) एक जानेवारी २००६ नंतर जन्मलेले

१९ वर्षांतील (बारावी पर्यत) एक जानेवारी २००४ नंतर जन्मलेले

"शारीरीक शिक्षण शिक्षक महासंघाने क्रीडा मंत्र्यांना निवेदन देत विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग मोफत करावा, अशी मागणी केली आहे. शुल्क वाढविण्यात आले आहे. त्याचा क्रीडा स्पर्धेतील विद्यार्थ्यांच्या सहभागावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली आहे. क्रीडा विभागाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आहे. संघटना गंभीर असून जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीसह बहिष्काराचा इशारा दिला आहे."

- संजय चव्हाण, संघटक, राज्य क्रीडा व शारीरीक शिक्षण शिक्षक महासंघ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वाती मालीवाल प्रकरणात CM केजरीवाल अन् त्यांच्या पत्नीची चौकशी होणार, महिला आयोग आक्रमक!

Darjeeling Tea: किंमती वाढल्या पण निर्यात घटली; दार्जिलिंग चहा संकटात का आहे?

JEE Advanced Admit Card 2024 : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी प्रवेशपत्र आज मिळणार; असे करा डाऊनलोड

Pakistan Espionage Case : पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी फरार मुख्य आरोपीला अटक; NIA ची कर्नाटकात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

SCROLL FOR NEXT