Tree Plantation esakal
नाशिक

Nashik News: ब्रह्मगिरीच्या पायऱ्यांवर पर्यावरण प्रेमींकडून ‘रोपांचा वे’! प्रस्तावित रोप वेला विरोध

निसर्गसंपदा जतन करण्यासाठी साधू, संत व ग्रामस्थ एकवटले

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी ते अंजनेरी या डोंगरांना जोडणाऱ्या रोप वेचा विषय वादात सापडलेला असताना पर्यावरण प्रेमींनी ब्रह्मगिरीवरच्या पायऱ्यांवर ‘रोपांचा वे’ साकारत प्रस्तावित रोप वेला विरोध केला.

येथील वृक्षसंपदा जतन करण्यासाठी साधू, महंत, ग्रामस्थ व पर्यावरण प्रेमी एकवटले आहेत. (Brahmagiri tree plantation by environmental lovers Opposition to proposed rope way Nashik News)

ब्रह्मगिरीवर एक झाड लावण्याचा संकल्प पर्यावरण प्रेमींनी केला आहे. वृक्षसंपत्तीने समृद्ध विविध भारतीय प्रजातींच्या रोपांची लागवड या निमित्ताने ब्रह्मगिरी येथे करण्यात येणार आहे.

तपोभूमी ब्रह्मगिरीचे पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी हवेतील रोप वेची गरज नसून वृक्षसंपदेचा रोप वे योग्य पर्याय ठरेल, यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

रोजगारनिर्मिती बरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी येथील ग्रामस्थ मनरेगाच्या माध्यमातून वृक्षसंगोपनाचा प्रयत्न करत असताना सरकारने सहकार्य करणे अपेक्षित आहे. जटायू पक्षांचा अधिवास धोक्यात घालून अंजनेरी ब्रह्मगिरी रोप वेची काय गरज, असा प्रश्न पर्यावरण प्रेमींनी वनमंत्र्यांसमोर उपस्थित केला आहे.

वनमंत्र्यांच्या भेटीनंतर जिल्हाधिकारी ब्रह्मगिरी अंजनेरी या पुरातन वनांचे संवर्धन करण्यासाठी ग्रामस्थांच्या ठरावाला मान देवून जटायू पक्षांचा अधिवास संपविणाऱ्या प्रस्तावित रोप वे विरोधात अहवाल मंत्र्यांना सादर करतील, अशी अपेक्षा पर्यावरण प्रेमींना आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पर्यटनवाढीच्या नावाने सरकारी योजनांचा वापर हजारो वर्षांच्या पायी पर्यटनाच्या धार्मिक परंपरा मोडीत काढून रोप वे करण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न होत आहे. यात केंद्र सरकारची दिशाभूल केली जात आहे, असा थेट आरोप पर्यावरण प्रेमी करतात.

वनसंपदेचा उपयोग येथील परंपरा,आदिवासी संस्कृती जपण्यासाठी करून माता गोदेचे पावित्र्य राखण्यास मदतच होईल, असे पर्यावरण प्रेमींचे मत व्यक्त केले. यावेळी आनंद आखाड्याचे स्वामी गणेशानंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते 'रोपांच्या वे'चे उद्‌घाटन करण्यात आले.

या प्रसंगी मेटघर ग्रामस्थ, हरित ब्रह्मगिरीचे ललित लोहगावकर, कैलास देशमुख, प्रकाश दिवे, जयंत दाणी, निशिकांत पगारे, जगबीर सिंग, डॉ.संदीप भानोसे, भारती जाधव, योगेश बर्वे, कुलदीप कौर, मनीष बाविस्कर आदींसह नाशिकमधील विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT