A medical team left with the organs of a brain-dead patient through the Green Corridor on Friday. 
नाशिक

Nashik News: मेंदूमृत युवा शेतकऱ्यामुळे 5 रुग्‍णांना नवजीवन; ग्रीन कॉरिडॉरने अहमदाबाद, पुण्याला रवाना

रस्‍ते अपघातात गंभीर जखमी ३४ वर्षीय युवा शेतकऱ्याला मेंदूमृत घोषित केल्‍यानंतर त्‍यांच्‍या कुटुंबीयांनी घेतलेल्‍या अवयवदानाच्‍या निर्णयाने तब्‍बल पाच रुग्‍णांना नवजीवन मिळाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News: रस्‍ते अपघातात गंभीर जखमी ३४ वर्षीय युवा शेतकऱ्याला मेंदूमृत घोषित केल्‍यानंतर त्‍यांच्‍या कुटुंबीयांनी घेतलेल्‍या अवयवदानाच्‍या निर्णयाने तब्‍बल पाच रुग्‍णांना नवजीवन मिळाले आहे. (Brain dead young farmer gives new life to 5 patients nashik news)

सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथून ग्रीन कॉरिडॉरने शुक्रवारी (ता.२२) दुपारी तीनच्‍या सुमारास हृदय अहमदाबादला, तर मूत्रपिंड थेट पुण्याला रवाना करण्यात आले. याशिवाय नेत्रदान केले असून, यामुळे दृष्टिबाधितांचे जीवन प्रकाशमान होणार आहे.

सह्याद्री सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजय चावला यांनी अधिक माहिती दिली. ते म्‍हणाले, की १९ डिसेंबरला बोरीची बारी (ता. पेठ) या पाड्यावरील ३४ वर्षीय युवा शेतकऱ्यास रस्ते अपघातात गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णाला गुरुवारी (ता. २१) मेंदूमृत घोषित केले होते.

नातेवाइकांनी पुढाकार घेऊन अवयवदानाची इच्छा व्‍यक्‍त केली. यानंतर सह्याद्री हॉस्पिटल प्रशासनाने पोलिस, संबंधित यंत्रणेच्या सहकार्याने ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून अवयव गरजू रुग्‍णांसाठी रवाना केले.

अवयवदानाबाबत समाजात जनजागृती होत असून, यामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळत असल्याचे संजय चावला यांनी नमूद केले. सह्याद्री हॉस्पिटलतर्फे डॉ. पंकज वारके, डॉ. दीपक पाटील आणि डॉ. जितेंद्र खैरनार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

विमानाने पाठविले हृदय

ग्रीन कॉरिडॉर करताना हृदय हे अहमदाबाद येथील सिम्स हॉस्पिटल येथे पाठविले. ओझर विमानतळापासून विशेष विमानाने हृदय घेऊन पथक रवाना झाले. तसेच एक मूत्रपिंड पुण्यातील डी. वाय पाटील हॉस्‍पिटल आणि दुसरे मूत्रपिंड पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल येथे घेऊन पथक रवाना झाले. तसेच यकृत पुण्यातील डी. वाय. पाटील हॉस्‍पिटलला नेण्यात आले. दोन्‍ही डोळे नाशिकच्‍या एनडीएमव्हीपी हॉस्पिटल येथील नेत्रपेढीत दान केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident एकमेकांचे जिवलग मित्र… मिळून थार घेतली; ताम्हिणी घाटात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची हृदयद्रावक करुणकथा

ऊसतोड मशीनमध्ये सापडून महिलेचा दुर्दैवी अंत; संक्रट्टी कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, हा भयंकर अपघात पाहून...

Pune News : काय सांगता? पुण्यात नगरसेवक पदासाठी चक्क १ कोटीची बोली...नेमका कुठं घडला प्रकार?

Tamhini Ghat Accident : प्रगतीची भरारी राहिली अर्धवट; अपघातानंतर कोंढवे धावडे, कोपरे परिसरात शोककळा

Latest Marathi News Live Update : तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी आज मालेगाव बंद

SCROLL FOR NEXT