Passengers alighted from the bus at Adgaon Junction esakal
नाशिक

Nashik : हाॅटेल मिर्चीजवळ STचे ब्रेक फेल; तत्पर चालकामुळे वाचले प्रवासी

सकाळ वृत्तसेवा

लासलगाव (जि. नाशिक) : लासलगाव आगारातून सुटलेली लासलगाव- नाशिक सकाळी आठची बस औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिर्चीजवळून जात असताना, अचानक बसचे ब्रेक फेल झाले. मात्र, बसचालकाने दाखविलेल्या प्रसंगाधानाने जवळपास ७५ ते ८० प्रवासी सुरक्षित बचावले. याच ब्लॅक स्पॉटवर मागील आठवड्यात झालेल्या अपघातात ११ प्रवाशांचा बळी गेला होता. ही घटना ताजी असताना, लासलगाव आगराच्या चालकाने दाखविलेल्या समयसूचकतेने दुर्घटना टळली. (Brake failure of ST Bus near Hotel Mirchi Passengers saved due to driver Nashik Latest Marathi News)

लासलगाव आगाराची नियमित धावणारी लासलगाव- नाशिक बस साडेनऊच्या सुमारास जात असताना, अचानक हॉटेल मिर्चीजवळ बसचे ब्रेक फेल झाले. चालक पी. व्ही. भाबड यांनी प्रसंगावधान दाखवत बस नियंत्रित करून बसमधील जवळपास ७५ प्रवाशांना सुरक्षितपणे आडगाव नक्यापर्यंत पोहोचविले. वाहक डी. यु. राठोड यांनी सर्व प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून रवाना केले. चालक आणि वाहक या दोघांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळल्याने प्रवाशांनी त्या दोघांचे आभार व्यक्त केले.

लासलगाव आगारातील बसेसचा दर्जा अत्यंत खालावला असून, अनेक नादुरुस्त बस रस्त्यावर धावत आहे. कोरोनापूर्वी लासलगाव आगारात ५६ बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी होत्या. मात्र, आता फक्त ३४ बसेस आहेत. आगारकडून मागणी करूनही नवीन बस येत नसल्याने पालकमंत्री दादा भुसे यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Updates : राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, आजही मुंबई-पुणे, मराठवाड्याला धोक्याचा इशारा

Kolhapur Dussehra : कोल्हापूरसाठी 'हा' कसला मानाचा तुरा, म्हणे राज्याचा प्रमुख महोत्सव; शाही दसऱ्यासाठी निधीच नाही

World Wrestling Championship 2025 : भारताच्या सुजीतची कडवी झुंज अपयशी, ऑलिंपिक विजेत्या रहमानचा ६-५ने विजय

सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं निधन, वयाच्या ४८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jalgaon News : पाचोरात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार, २५० गुरे वाहून गेली, असंख्य गावे पाण्याखाली

SCROLL FOR NEXT