NMC News esakal
नाशिक

NMC News: इलेक्ट्रिक बस खरेदी प्रस्तावाला ब्रेक! प्रदूषणमुक्तीसाठी अन्य प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा

NMC News : केंद्र शासनाने ‘एन- कॅप’ योजनेअंतर्गत प्रदूषणमुक्तीसाठी महापालिकांना निधी दिल्यानंतर बहुतांश महापालिकांनी इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याची प्रस्ताव सादर केले.

परंतु इलेक्ट्रिक बस उत्पादनाला मर्यादा येत असल्याने नाशिक महापालिकेच्या प्रस्तावाला ब्रेक लागला आहे नुकत्याच राज्य शासनाकडे झालेल्या बैठकीत प्रदूषणमुक्तीसाठी अन्य प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Break to electric bus purchase proposal Instructions for submission of other proposals for pollution abatement nmc nashik)

शहर बससेवा राज्य परिवहन महामंडळाकडून महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. महापालिकेकडून सध्या अडीचशे बस सुरू आहे. त्यात दोनशे बस सीएनजी, तर ५० बस डिझेलवर सुरू आहेत.

बससेवेच्या संचलनासाठी महापालिकेकडून सिटीलिंक कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. सिटीलिंक कंपनीकडून बसचालकांना किलोमीटर प्रमाणे पैसे अदा केले जातात. लोकसंख्येचा विचार करता बसची संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे.

त्याअनुषंगाने नाशिक महापालिकेला केंद्र शासनाकडून प्रदूषणमुक्तीसाठी एन-कॅप योजनेअंतर्गत ४० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. त्या निधीतून ५० इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला जाणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यापूर्वी मुंबईमध्ये केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. त्यात प्रदूषणमुक्तीसाठी केलेल्या उपाययोजना व झालेला खर्चाची माहिती घेण्यात आली. महापालिकेकडून ५० इलेक्ट्रिक बस खरेदी केल्या जाणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिली.

परंतु राज्यातील जवळपास दहा महापालिकांनी इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र इलेक्ट्रिक बसचे उत्पादन अत्यंत संथगतीने सुरू आहे. नवीन इलेक्ट्रिक बस रस्त्यावर उतरण्यासाठी जवळपास दीड ते दोन वर्षाचा कालावधी लागेल.

त्यामुळे नाशिक महापालिकेला इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा प्रस्ताव सादर करू नये असा सल्ला देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने इलेक्ट्रिक बस खरेदी न करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आयुक्त करंजकर यांनी दिली.

"‘एन- कॅप’ योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचे विचाराधीन आहे. मात्र, इलेक्ट्रिक बसचे उत्पादन संथगतीने होत असल्याने फेरविचार केला जाणार आहे."

- डॉ. अशोक करंजकर, आयुक्त, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात रात्री झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची दोन्ही समाजांसोबत बैठक

Chhagan Bhujbal : लिंगायत समाजातील पोटजातींचा लवकरच ओबीसींमध्ये समावेश; मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन!

"म्हणून मी वडिलांचं टॅक्सी चालवणं बंद केलं.." ती आठवण सांगताना ढसाढसा रडले भरत जाधव; जुना VIDEO चर्चेत

Rohit Sharma नवी लँबॉर्गिनी घेऊन निघाला, मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकला; फॅनने पाहताच पाहा कशी दिली रिअ‍ॅक्शन

SCROLL FOR NEXT