bribe crime esakal
नाशिक

Nashik Bribe Crime: वीजमीटर बसवून देण्यासाठी 7 हजारांची घेतली लाच; वाडीवऱ्हेच्या वरिष्ठ तंत्रज्ञासह दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

वाडीवऱ्हे : वीजमीटर बसवून दिले म्हणून बारा हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीनंतर सात हजार रुपयांची लाच घेताना वाडीवऱ्हे येथील महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञासह एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

वरिष्ठ तंत्रज्ञ नागेश्वर रघुनाथ पेंढारकर (वय ३५) व शुभम रामहरी जाधव (२३), अशी लाच घेणाऱ्यांची नावे आहेत. (bribe of 7 thousand was taken to install electricity meter 2 arrested along with senior technician of Wadivareh Nashik)

तक्रारदारांचे वाडीवऱ्हे गावातील दोन व्यावसायिक आणि एक घरगुती मीटर पेंढारकर यांनी बसवून दिले होते. त्याबद्दल बक्षीस म्हणून पेंढारकर यांनी तक्रारदाराकडे बारा हजार रुपयांची लाच मागितली.

तडजोडीअंती सात हजार स्वीकारण्याचे मान्य केले. ही रक्कम पेंढारकर यांनी एका खासगी व्यक्तीकडे देण्यास सांगितली. त्यानंतर विभागाने सापळा रचून कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक नितीन पाटील, पोलिस नाईक अजय गरुड, प्रभाकर गवळी, महिला पोलिस शिपाई शीतल सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: शुभमन गिल टीम इंडियासोबत दुसऱ्या कसोटीसाठी प्रवास करणार की नाही? अखेर BCCI नेच दिले अपडेट

Viral News : ऑफिसमध्ये मॅनेजर बनायचा हिटलर! सुट्टी-वर्क फ्रॉम होमवर विचारायचा शंभर प्रश्न; वैतागून तरुणाने केला धक्कादायक प्रकार

Latest Marathi Breaking News Live Update : आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवला शीतल तेजवानीचा जबाब

Satara Politics:'भाजपचा सातारा नगरपालिकेत महाविकास आघाडीला दणका'; आशा पंडित बिनविराेध विजयी..

Kolhapur Election: कोल्हापुरात निष्ठेला तिलांजलि, संधिसाधू राजकारणाची परंपरा जुनीच; मुश्रीफ-घाटगे युतीमुळे पुन्हा चर्चा

SCROLL FOR NEXT