Education Department Yeola esakal
नाशिक

Nashik Bribe Crime: येवल्यात पुन्हा शिक्षण विभागात पकडला लाचखोर! लिपिक ACB च्या जाळ्यात!

संतोष विंचू

Nashik Bribe Crime : जिल्ह्यातील शिक्षण विभागासह इतर शासकीय कार्यालयातील लाच खोरीच्या घटना व त्यावर होणारी चर्चा ताज्या असतानाच आज पुन्हा येथील पंचायत समितीतील शिक्षण विभागात एक लाचखोर लिपिक लाच घेताना पकडला गेला आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा जिल्ह्याचे शिक्षण क्षेत्र हादरले आहे. (Bribe taker found in education department at yeola Clerk arrested by ACB Nashik Bribe Crime news)

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईमध्ये येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपिकाला दोन हजाराची लाच घेताना पकडले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराची येथून बदली झाली असून त्याला आवश्यक असलेले पत्र देण्यासाठी सदरचा लिपिक ही रक्कम मागत होतात. प्रत्येक कामासाठी पैसे देणार कसे व कुठून हा प्रश्न शिक्षण क्षेत्रात होत आहे.

याचमुळे वैतागलेल्या संबंधित कर्मचाऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलून सदरच्या लिपिकाला पकडून दिल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान या कारवाईनंतर शिक्षण विभागामध्ये खळबळ उडाली आहे.

लाचखोर लिपिकाला एलसीबीचे पथक चौकशीसाठी शासकीय विश्रामगृहावर घेऊन गेल्याचेही सांगण्यात आले असून अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान,नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे- वालवलकर यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आजच्या कारवाईमुळे नाशिक जिल्ह्यात लाचखोरावर कारवाईचं शतक पूर्ण झाल्याची चर्चा आहे.

दरम्यान, मागील महिन्यात १० मे रोजी गाय गोठ्याच्या फायलीवर सही करण्यासाठी पंचायत समितीतील ग्रामपंचायत विभागाच्या विस्तार अधिकाऱ्यांसह कंत्राटी कार्यक्रम अधिकार्याला लाच घेण्याचे मान्य केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे.

या घटनेला महिना उलटत नाही, तोच दुसरी घटना घडल्याने पंचायत समितीच्या कारभाराची ही चर्चा रंगत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"अपमान सहन करून ते कॉरिडॉरमध्ये बसून राहायचे" रंजनाच्या अपघातानंतर अशोक मामांच्या अवस्थेबद्दल खुलासा

Pune Fraud News : शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची दीड कोटींची फसवणूक

Rain-Maharashtra Latest Live News Update: लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या १२,००० पुरूषांच्या खात्यांची तपासणी सुरु - आदिती तटकरे

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

SCROLL FOR NEXT