murder esakal
नाशिक

Nashik Crime News : वीटभट्टी मजूराचा मारहाणीत मृत्यू; खून करून प्रेत टाकले गरुडेश्‍वर शिवारात

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : दोघांनी केलेल्या मारहाणीत विटभट्टी कामगार ठार झाला आहे. खुन करून प्रेत वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंढेगाव, अस्वली स्टेशन रस्त्यावरील गरुडेश्‍वर येथील मरी माता मंदिराजवळ फेकण्यात आले. (Brick kiln labourer died in beating nashik crime news)

याबाबत मृत मजूराच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घोटी परिसरात वांगेवाडी येथील वीटभट्टीवर मजूर म्हणून कामाला असलेल्या संपत मधु मुकणे (वय ३४, मुळ रा. जोगलवाडी, ता. मोखाडा, जि. पालघर) यास संशयित बुधा रतन वळवी व शंकर रतन वळवी (दोघेही रा. वीटभट्टी, वांगेवाडी) या दोघांनी मिळून लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

यात संपत मुकणे याचा जिव्हारी मार लागल्याने मृत्यू झाला. त्यानंतर संशयितांनी त्याचा मृतदेह गरुडेश्‍वर शिवारातील मरीमाता मंदिराजवळ फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी संपतची आई शांताबाई मधु मुकणे यांनी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीसांनी तातडीने हालचाल करुन दोन्ही संशयितांना तत्काळ ताब्यात घेतले. अनैतिक संबधांच्या कारणातून हा खून झाल्याचा संशय आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक कविता फडतरे, वाडीवऱ्हेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार, उपनिरीक्षक सुनील बिऱ्हाडे, श्याम सोनवणे, प्रकाश गायकवाड आदींनी घटनास्थळी धाव घेतली. उपनिरीक्षक बिऱ्हाडे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT