bsnl esakal
नाशिक

Nashik News: कंधाणेत BSNL सेवेचा बोजवारा; मनोरे बनले शोभेचा पुतळा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : येथील भारत संचार निगम लिमिटेड कंपनीने लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेला मनोरा अडचण नसून खोळंबा अशी स्थिती निर्माण झाली असून ग्राहकांना रेंज मिळत नसल्याने मोबाईल सेवेचा पुरता बोजवारा उडाल्याने मोबाईल धारकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. (BSNL service problematic in Kandhane tower became statue Nashik News)

पंचक्रोशीतील सात ते आठ गावांना बीएसएनएल कंपनीतर्फे कंधाणे गावात मनोरा (टॉवर) उभारला. परंतु वारंवार तांत्रिक अडचणी व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचे साफ दुर्लक्ष असल्याने ग्राहकांना सेवा देण्यासाठी बेभरवशाची झाली आहे.

बीएसएनएल सेवेतून कॉल केल्यास कधी नॉटरिचेबल तर नेटवर्क उपलब्ध नाही अशी उत्तरे ऐकावयास मिळतात. यासह इंटरनेटचा स्पीड मिळत नसल्याने अंगणवाडी प्राथमिक शाळेतील दैनंदिन पोषण आहार माहिती भरणे,

वरिष्ठ कार्यालयाकडून लिंकद्वारे माहितीची देवाणघेवाण करणे, विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करणे, पीकविमा भरणे, विविध बिले भरणे, स्पर्धापरीक्षा, नोकरी संदर्भातील अर्ज भरणे अशी व यासह इतर ऑनलाइन कामे करणारे ग्राहक देखील बीएसएनएलच्या सेवेमुळे त्रस्त झाले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे पंचक्रोशीतील अनेक ग्राहक हे खासगी मोबाईल सेवा देणाऱ्या कंपनीकडे वळले आहे. त्यामुळे गावातील मनोरा फक्त गावासाठी शोभेची वस्तू बनली आहे.

ऑनलाइनच्या जमान्यात मोबाईल अत्यावश्यक झाल्याने मात्र वारंवार खंडित होणाऱ्या नेटवर्क तसेच इंटरनेट अभावी मोबाईल धारक त्रस्त झाले असून संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून मोबाईल सेवा सुरळीत चालू करावी अशी मागणी परिसरातील मोबाईल धारकांनी केली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT