The graveyard lit up with the lights of ancestors on the occasion of Deepotsav. In the second photo, Bhajani Mandal and villagers performing Bhajan. esakal
नाशिक

Diwali Festival: बजेट मामांची संकल्पना; सलग चौथ्या वर्षीही उजळली मुखेडची स्मशानभूमी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव नेऊर : मुखेड (ता. येवला) येथील भाऊसाहेब चव्हाण ऊर्फ बजेट मामा यांच्या संकल्पनेतून ‘स्मशानातील दिवाळी’ उपक्रम सलग चौथ्या वर्षी राबविण्यात आला.

या उपक्रमात या वर्षी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी सहभाग घेतला. (Budget Mama Concept cemetery of Mukhed lit up for fourth year in row Diwali Festival Nashik)

चार वर्षांपूर्वी बजेट मामा यांनी दीपावलीनिमित्त मुखेडची स्मशानभूमी स्वच्छ केली आणि पणत्याही लावल्या. त्यांचा हा उपक्रम ग्रामस्थांना आवडला व ग्रामस्थही सहभागी झाले. या वर्षी प्रत्येकाच्या घरून पाच पणत्या आणून हा उपक्रम राबविला.

ग्रामस्थांचे सहकार्य मिळाल्याने हजारो पणत्या गोळा झाल्या आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी स्मशानभूमी उजळून निघाली. या वर्षी स्मशानभूमीत व बाहेर सडा रांगोळी काढण्यात आली. जागोजागी फुलांचे तोरण बांधण्यात आले.

एवढेच नव्हे, तर भजनी मंडळाच्या सहकार्याने रात्रभर भजनांचा कार्यक्रम झाला. स्मशानभूमी म्हटले, की अंधश्रद्धेपोटी ग्रामस्थ घाबरतात. मात्र, ही अंधश्रद्दा कमी करण्यासाठी भजनी मंडळाने बुक्का लावण्याऐवजी चक्क स्मशानातील राखेचा वापर केला.

रांगोळी काढण्यासाठी व सजावट करण्यासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. शिवसेना नेते छगन आहेर, अनंता आहेर, अरुण पाटील, सोमनाथ पानसरे, बाळासाहेब गुंड, रावसाहेब आहेर, भाऊसाहेब चव्हाण, प्रकाश घोटेकर, शांताराम आहेर, दत्तू आहेर, विजय कदम, शिवराज देवरे, संजय आहेर, संपत आहेर, खंडू आहेर, रघुनाथ पानसरे, कारभारी आहेर, सुनील पगार, आप्पा आरोटे,

बाळू मेमाणे, अरुण गुंड, सुनील आहेर, भास्कर आहेर, प्रकाश वाघ, सुरेश माळी, राजेंद्र पगार, विलास आहेर, बाबासाहेब चव्हाण, अर्जुन वाघ, पोपट राऊतराय, संदीप चव्हाण, नवनाथ सानप, बाळासाहेब पांगारकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

मुखेड गावातील भाजीपाला विक्री करून आपले गुजरण करणारे भाऊसाहेब चव्हाण सकाळी सहा ते सात या वेळेत स्मशानभूमीत स्वच्छता करतात.

बाजारतळात वटवृक्ष लावून पर्यावरण संवर्धन करतात. स्मशानभूमीचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवून परिसरात लावलेल्या झाडांना पाणी देतात. त्यांची ही कामे अविरतपणे सुरू आहेत, तेही कोणत्याही अपेक्षविना.

एक साधारण व्यक्ती अनन्यसाधारण काम सहज करू शकतो, हे चव्हाण यांच्या आगळ्यावेगळ्या कार्याची ओळख प्रासंगिक स्मशानात येणाऱ्यांना येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT