A bullock cart owned by the Golesar family.
A bullock cart owned by the Golesar family. 
नाशिक

Nashik News: बैलगाडी नामशेष होण्याच्या मार्गावर; विज्ञानामुळे पारंपरिक शेतीत बदल

सकाळ वृत्तसेवा

Nashik News: शेतीसह नागमोडी वाट असो किंवा सपाट-सखल मातीच्या कच्च्या रस्त्यावरून सुसाट वेगाने धावणारी शेतकऱ्यांची बैलगाडीचे दर्शन आता दुरापास्त झाले आहे. प्राचीन काळात राजवटीत रथ होता. तेव्हापासून शेतकऱ्यांचे वाहतुकीचे साधन असलेल्या बैलगाडीला महत्त्वाचे स्थान होते.

घरापुढे बैलगाडी असणे ही प्रतिष्ठेची बाब मानली जात होती. पूर्वी रस्त्यांचा विकास झालेला नव्हता. बैलगाडी त्यावेळी दळणवळणाचे प्रमुख साधन होते. बैलगाडीतूनच नवरदेवाची वरात काढली जात असे, तसेच देवदेवतांची मिरवणूक काढली जात होती. (Bullock cart on verge of extinction nashik news)

आयती लोखंडी बैलगाडी मिळू लागल्याने लाकडी बैलगाडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. विज्ञानाचा विकास होत गेला, डोंगर-दऱ्यातून पक्के रस्ते तयार झाले. दळणवळणाच्या साधनांमध्ये वाढ झाली. शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर, रिक्षा, टेम्पो व इतर मालवाहतूक साधने आली. त्यांच्या मदतीने जलद वाहतूक होऊ लागली.

शेतीचे कामेही जलद गतीने होऊ लागल्याने वेळेची बचत झाली. शेतमाल ट्रॅक्टरने व रिक्षा, टेम्पोने बाजारात जाऊ लागल्याने बैलगाडीची गरज कमी झाली. सिन्नर तालुक्यात आता कमी प्रमाणात बैलगाड्या शिल्लक आहेत. त्यामुळे येणाऱ्या पिढीला पुस्तकात बैलगाडी बघायला मिळेल, असे वाटू लागले आहे.

बैलाच्या मानेवर असणारे ‘जू’ मात्र लाकडाचे आहे. तेवढी एकच जुनी खुण शिल्लक राहिली आहे. बैलगाडीचा प्रवासासाठी होणारा उपयोग जवळ जवळ आता बंदच झाला आहे. साधारणपणे बैलगाडीला आखरी पेटी, धुन्या, सर आदी भाग असतात, तसेच मोठ्या गोलकार आकराची चाके असतात.

त्याला धाव असे म्हणतात. त्यांना जोडणारा आक व चाक निखळून पडू नये, म्हणून त्याला कानखिळी असते. या चाकांना ऑईल टाकले जाते. त्याला ‘गाडवंगण’ असे म्हटले जोते. काळाच्या ओघात बैलगाडी नामशेष झाल्याने तरुण पिढीला फक्त चित्रातील बैलगाडी पाहायला मिळत आहे.

अलीकडच्या काही वर्षांत लाकडी वखर, नागर, तिफन, कोळपे, दबे, कुळव आदी शेतीपयोगी अवजारे काळ्या मातीतून गायब होत चालली आहेत. नवनवीन तंत्रज्ञानामुळे पारंपरिक पद्धतीने होणारी शेती आता मागे पडत चालली आहे आधुनिक पद्धतीने शेती होऊ लागली आहे, आता असे म्हणण्याची वेळ आली आहे

"आधुनिक तंत्रज्ञानाच्या परिणामामुळे ग्रामीण भागातही वाहनाचा वापर अधिक वाढला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात वाहतुकीचे महत्त्वाचे साधन असलेले पुरातन बैलगाडी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांची शान समजली जाणारी बैलगाडी आता काळाच्या ओघात मर्यादित होत चालली आहे." -अमोल गोळेसर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT