Garbage lying on an open plot in Masternagar area here. esakal
नाशिक

Nashik News : मालेगावच्या पूर्व भागात स्वच्छतेचा उडाला बोजवारा!

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील पूर्व भागात गटारी व स्वच्छतेच्या प्रश्न नेहमीच ऐरणीवर असतो. या भागात स्वच्छता वेळेवर होत नाही. स्वच्छता व्हावी, यासाठी नागरिक आंदोलन करतात.

आंदोलन केल्यानंतर तात्पुरती दखल घेतली जाते. येथील मदनीनगरसह असंख्य भागात कचरा उचलण्यासाठी रोज घंटागाडी येत नाही. विशेषतः झोपडपट्टी भागात स्वच्छतेची दयनीय अवस्था आहे. बहुसंख्य नागरिक मोकळ्या भूखंडावर कचरा टाकतात. येथे मनपाच्या काही शाळांजवळ देखील कचरा टाकला जातो.

त्यामुळे शाळेच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या भागात स्वच्छतेसाठी मनपा अधिकाऱ्यांना सांगूनही दुर्लक्ष केले जात असल्याचे परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. (burden of cleanliness in eastern part of Malegaon Nashik News)

शहरातील पूर्व भागातदेखील असंख्य नवीन वस्त्या उदयास आल्या आहेत. या भागात वेळेवर घंटागाडी येत नाही. त्यामुळे नागरिकांना नाइलाजाने मोकळ्या भूखंडावर कचरा टाकावा लागत आहे.

येथील मास्टरनगर, जमुहूरनगर, मदनीनगर, सय्यद पार्क, पवारवाडी, रमजानपुरा, नवीन सालाटर हाउसजवळील नेमत बाग, निकहत पार्क यांसह असंख्य भागात वेळत स्वच्छता होत नाही. स्वच्छता होत नसल्याने येथे मोकळ्या भूखंडावर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे या भागातील गटारी तुडुंब भरलेल्या आहे.

या भागात रोगराई पसरली आहे. येथील मदनीनगर व सलामताबाद भागात तीन महिन्यांनंतर स्थानिक नागरिकांनी तक्रार दिल्याने साफसफाई होते. येथील मास्टरनगर भागात असलेल्या महापालिकेच्या नवीन सात शाळेच्या आवारात कचरा साचलेला असतो. या शाळेला कंपाउंड नसल्याने नागरिकांकडून येथे कचरा टाकला जातो.

तसेच शाळेतील प्रांगणात सुटीच्या वेळेत विद्यार्थी खेळतात. विद्यार्थ्यांना खेळताना पायात काच्या टोचल्याने त्यांना इजा होते. महापालिकेने शाळेला कंपाउंड करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

तसेच नवीन सालाटर हाऊसजवळील नेमत बाग भागातील महापालिकेच्या मनपा शाळा क्रमांक २८/३६ समोरील मैदानावर कचऱ्याचे ढीग आहे. शाळेच्या परिसरात कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. शहराच्या कॅम्प, संगमेश्वरच्या, सोयगाव येथील अनेक भागातही नियमित कचरा उचलला जात नाही. प्रशासक कारकीर्दीत माजी नगरसेवकांचा प्रभाव पडत नाही.

"मदनीनगर भागात वेळेवर स्वच्छता होत नाही. त्यामुळे नाइलाजाने नागरिक कचरा मोकळ्या भूखंडावर टाकतात. या भागात स्वच्छता करावी."

-मोहम्मद जविद, मदनीनगर, मालेगाव

"महापालिकडे स्वच्छता विभागाचे कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे या भागात स्वच्छता होत नाही. स्वच्छतेसाठी मनपा कर्मचाऱ्यांना फोन करून बोलवावे लागते. कर भरण्यासाठी नागरिकांना महापालिकेतर्फे तगादा लावला जातो." - अश्‍पाक मोहंमद मुन्नवर रहिवासी, नेमत बाग, मालेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT