Iron box stolen from Arun Madhwai's house. esakal
नाशिक

Nashik Crime News : चिचोंडी खुर्द येथे घरफोडी; 55 हजाराचा मुद्देमाल लंपास

चिचोंडी खुर्द (ता. येवला) येथील पर्णकुटी परिसरातील अरुण तात्याराम मढवई यांच्या घरात रविवारी (ता. १५) रात्री एकच्या दरम्यान चोरट्याने प्रवेश केला व त्यांच्या आईची लोखंडी पेटी चोरून नेली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : चिचोंडी खुर्द (ता. येवला) येथील पर्णकुटी परिसरातील अरुण तात्याराम मढवई यांच्या घरात रविवारी (ता. १५) रात्री एकच्या दरम्यान चोरट्याने प्रवेश केला व त्यांच्या आईची लोखंडी पेटी चोरून नेली.

पेटीत ४० हजार रुपयांचे दागिने व १४ हजारांची रोकड होती. (Burglary in Chichondi 55 thousand worth of property stolen nashik crime news)

एकूण ५५ हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. सकाळी उठल्यावर अरुण मढवई यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरून नेलेली पेटी शेतात मिळून आली.

त्यातील वस्तू फेकून देत दागिने व पैसे चोरून नेले. येवला शहर पोलिसांनी चोरीचा तपासासाठी श्‍वानला पाचारण केले. मात्र, चोरट्याचा माग लागला नाही.

१५ दिवसांपूर्वी देखील येथील एकनाथ मढवई यांची हॉटेलचे कुलूप तोडून रोकड, तेल डबा, बिस्कीट, खारी, मिठाईची चोरी झाली होती. विहिरीवरील पंप, स्पिंकलरचे सेट चिचोंडी खुर्द परिसरात चोरी जाण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या चोरीचा तपास येवला शहर पोलीस ठाण्याचे श्री.बोडके करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT