burglary esakal
नाशिक

घरांना कड्या लावून सराफ बाजारात धाडसी घरफोडी! सुरक्षा ऐरणीवर

विनोद बेदरकर

नाशिक : कायम ४३ सीसीटीव्हींची नजर, सुरक्षारक्षक आणि हाकेच्या अंतरावर पोलिस चौकी असलेल्या चिंतामणी सोसायटीत रविवारी (ता. २६) मध्यरात्री धाडसी चोरीमुळे सराफ बाजारातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. चोरट्यांनी चोरी करताना सोसायटीतील सर्व फ्लॅटला बाहेरून कडी लावली होती. चोरट्यांनी बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून चांदीची गणेशमूर्ती, देवाच्या पूजेची सोने व चांदीची उपकरणे, मूर्ती, तीन कॅमेरे, तवा, चार्जर, शूज, तांब्याच्या वस्तू, कडई, नवीन कपडे लंपास केले. (burglary-in-Saraf-Bazaar-marathi-news-jpd93)

सुरक्षारक्षक अन्‌ ४३ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना हुलकावणी

सराफ बाजारातील नगरकर लेनमधील चिंतामणी सोसायटीतील पहिल्या मजल्यावर अनिल चव्हाण यांचा फ्लॅट आहे. त्यांचे कुटुंबीय दुसऱ्या इमारतीतील फ्लॅटमध्ये राहतात. ते रविवारी सायंकाळी पाचला फ्लॅट बंद करून घरी गेले होते. सोमवारी (ता. २७) सकाळी सहाला वृत्तपत्र विक्रेत्याला या भागातील सर्वांच्या फ्लॅटला बाहेरून कडी लावल्याचे दिसले. त्याने सोसायटीतील फ्लॅटधारकांना सांगितले. त्यातून चव्हाण यांच्या फ्लॅटमध्ये चोरी झाल्याचे उघडकीस आले. चोरट्यांनी घरातील सर्व संसारोपयोगी साहित्याची उचकापाचक केली होती. त्यामुळे सर्वत्र साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. चोरट्यांनी घरातून सोने व चांदीच्या देवाची उपकरणांसह नवीन कपडे, तवा, कॅमेरे लंपास केले. चोरट्यांनी चोरीचा माल नेण्यासाठी चव्हाणांच्या मुलांची बॅगही नेली. जाताना जुने सँडल ठेवून नवीन बूट घालून गेल्याचे समोर आले. चोरीची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी येत पाहणी केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti news : सोलापुरात ऊस दरावरून रणकंदन; राजू शेट्टी आक्रमक

Luck Zodiac Signs: पुढचे १२२ दिवस या राशींवर पडणार पैशांचा पाऊस! गुरूच्या वक्री चालीचा मोठा फायदा; नशिबाची दारं उघडणार? तुमची रास कोणती?

Syed Mushtaq Ali Trophy: सूर्यकुमारचं वादळ पुन्हा घोंगावलं! ९ चौकार अन् ७ षटकारांसह अर्धशतक करत मुंबईला मिळून दिला मोठा विजय

Latest Marathi News Update : सोलापूरनंतर आता 'स्वाभिमानी'चा मोर्चा बारामतीकडे; ऊसाच्या पहिल्या उचलीसाठी कारखान्यांना २५ तारखेपर्यंतचा अल्टीमेटम

Supreme Court: सुनावणीपूर्वी इंडिया आघाडीची आक्रमक खेळी; मुख्य निवडणूक आयुक्तांना 48 प्रश्न विचारण्याची मागितली परवानगी

SCROLL FOR NEXT