Burglary latest nashik crime news esakal
नाशिक

तिडके कॉलनीत जबरी घरफोडी; सव्वापाच लाखांचा मुद्देमाल चोरीला

नरेश हाळणोर

नाशिक : शहराच्या मध्यवर्ती परिसर असलेल्या तिडके कॉलनीत भरदिवसा चोरट्यांनी बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून सोन्याचे दागिने व रोकड असा सव्वा पाच लाखांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात जबरी घरफोडीचा (Burglary) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (burglary in Tidke Colony goods worth 5 lakh 21 thousand were stolen nashik latest marathi crime news)

कविता चंद्रात्रे (रा. गोपाळ अपार्टमेंट, तिडके कॉलनी, त्र्यंबकरोड) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या गुरुवारी (ता. १४) सायंकाळी श्रीमती चंद्रात्रे या त्यांच्या वडीलांना टिळकवाडीतील हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचारासाठी घेऊन गेल्या होत्या.

त्यांचा फ्लॅट बंद होता. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील रोकड व सोन्याचे दागिने असा ५ लाख २१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

यात, ३ लाख ६० हजार रुपयांच्या सोन्याचे वेढे, ४० हजार रुपयांची सोन्याची बिस्कीटे, ८० हजार रुपयांची सोन्याचे मंगळसूत्र, १६ हजार रुपयांचे सोन्याचे कामातील टॉप्स आणि २५ हजार रुपयांची रोकड असा ऐवज आहे.

याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात जबरी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक डी.व्ही. शेळके हे तपास करीत आहेत. दरम्यान, भरदिवसा झालेल्या या घरफोडीच्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

बागवानपुऱ्यात चोरी

बागवान पुऱ्यातील हरिनगरीमध्ये अज्ञात चोरट्याने घरातून घुसून पर्समधील सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेल्याची घटना घडली. रुक्साना अजगर पठाण (रा. हरिनगरी, बागवान पुरा, जुने नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या शुक्रवारी (ता.१५) अज्ञात चोरट्यांने पठाण यांच्या उघड्या घरात शिरून पर्समधील ३३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

यात १२ हजारांची सोन्याची अंगठी, ३ हजारांचे चांदीचे दागिने, ३ हजारांची रोकड, दोन मोबाईल असा मुद्देमाल आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक डी.वाय. पवार हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT